शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

नागपुरात रेल्वे कर्मचा-याला पिस्तुलसह अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 22:54 IST

सेंट्रल रेल्वे एम्प्लॉईज क्रेडीट को आॅपरेटीव्ह सोसायटीत वरिष्ठ लिपिक असलेल्या एका तरुणाला पाचपावली पोलिसांनी पिस्तुलासह पकडले.

ठळक मुद्देपाचपावली पोलिसांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सेंट्रल रेल्वे एम्प्लॉईज क्रेडीट को आॅपरेटीव्ह सोसायटीत वरिष्ठ लिपिक असलेल्या एका तरुणाला पाचपावली पोलिसांनी पिस्तुलासह पकडले.असलम खान हबीब खान (वय २७, रा. वैशालीनगर) असे आरोपीचे नाव आहे. तो आणि त्याचा एक साथीदार कमाल चौकातील ताज पान मंदीर समोर बुधवारी रात्री ७.३० वाजता उभे होते. त्यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पाचपावली पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलीस पथकाने या दोघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. तेथे असलमची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तूल मिळाले. पोलिसांनी ते जप्त केले. पिस्तुलात असलेले मॅगझिन रिकामे होते. त्यात एकही काडतूस (गोळी) पोलिसांना आढळली नाही. अधिक चौकशीत त्याच्या सोबतचा साथीदाराचा असलमकडे असलेल्या पिस्तुलासोबत कसलाही संबंध नसल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी त्याला सोडून दिले. दरम्यानच्या चौकशीत असलमविरुद्ध यापूर्वी एक ३२४ चा गुन्हा असल्याचे स्पष्ट झाले. तो सेंट्रल रेल्वे एम्प्लॉईज क्रेडीट को आॅपरेटीव्ह सोसायटीत वरिष्ठ लिपिक असल्याचेही तपासात उघड झाले. पोलिसांनी त्याला भारतीय शस्त्र कायद्याचे कलम ३/ २५ अन्वये अटक केली. परिमंडळ तीनचे उपायुक्त राहुल माकणीकर, सहायक आयुक्त वालचंद्र मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचपावलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे आणि आर. एल. दुबे यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक पी. आर. इंगळे, हवलदार रामेश्वर कोहळे, नायक राज चौधरी, अभय साखरे, विजय लांडे, विनोद गायकवाड यांनी ही कामगिरी बजावली.

 

टॅग्स :Crimeगुन्हाEmployeeकर्मचारी