रेल्वे क्वाॅर्टर परिसर भंगार व्यावसायिकांच्या ताब्यात ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:12 IST2021-01-16T04:12:17+5:302021-01-16T04:12:17+5:30
नागपूर : मागील काही दिवसापासून भंगार व्यावसायिकांनी गार्ड लाईन येथील रेल्वे क्वाॅर्टरमध्ये अतिक्रमण करून रेल्वे क्वाॅर्टरच्या परिसरात भंगार ठेवले ...

रेल्वे क्वाॅर्टर परिसर भंगार व्यावसायिकांच्या ताब्यात ()
नागपूर : मागील काही दिवसापासून भंगार व्यावसायिकांनी गार्ड लाईन येथील रेल्वे क्वाॅर्टरमध्ये अतिक्रमण करून रेल्वे क्वाॅर्टरच्या परिसरात भंगार ठेवले आहे. रेल्वेकडून या भंगार व्यावसायिकांवर यापूर्वी कारवाई झाली. परंतु पुन्हा त्यांनी अतिक्रमण केल्याची स्थिती आहे.
मध्य रेल्वे नागपूर विभागातील रेल्वे कर्मचाऱ्यांना गार्ड लाईन येथील कॉलनीत क्वाॅर्टर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. परंतु येथील काही क्वाॅर्टरच्या परिसरात भंगार व्यावसायिकाने भंगार ठेवले आहे. सुरुवातीला या भंगार विक्रेत्यांची लहान दुकाने होती. परंतु रेल्वेने कारवाई न केल्यामुळे अतिक्रमण वाढत गेले. भंगार व्यावसायिकांनी कॉलनीतील सुरक्षा भिंतीच्या आत भंगार ठेवण्यास सुरुवात केली आहे. तेथे त्यांनी एक लहान झोपडीही बांधली आहे. रेल्वेची भिंत तोडल्यामुळे सप्टेंबर महिन्यात रशीद कुरेशी या भंगार व्यावसायिकासह सहा जणांवर कारवाई करण्यात आली होती. परंतु दोन महिन्यानंतर परत जैसे थी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाने गार्ड लाईन कॉलनीतील अतिक्रमण काढावे,अशी मागणी रेल्वे कर्मचारी करीत आहेत.