भाडेवाढीने मोडणार रेल्वे प्रवाशांचे कंबरडे

By Admin | Updated: May 18, 2014 00:49 IST2014-05-18T00:49:48+5:302014-05-18T00:49:48+5:30

रेल्वे बोर्डाने प्रवासी भाडेवाढ करून तीन महिन्यांचा कालावधी उलटला नाही, तोच पुन्हा एकदा पाच किंवा सात नव्हे तर तब्बल १४ टक्के रेल्वेभाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Railway passengers will be affected by hike in fares | भाडेवाढीने मोडणार रेल्वे प्रवाशांचे कंबरडे

भाडेवाढीने मोडणार रेल्वे प्रवाशांचे कंबरडे

१४.२ टक्यांनी वाढ : ‘अब की बारी, महंगी हुई सवारी’

नागपूर : रेल्वे बोर्डाने प्रवासी भाडेवाढ करून तीन महिन्यांचा कालावधी उलटला नाही, तोच पुन्हा एकदा पाच किंवा सात नव्हे तर तब्बल १४ टक्के रेल्वेभाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे बोर्डाच्या या निर्णयामुळे एकच खळबळ उडाली असून त्यांना ‘अब की बार मोदी सरकार’ ऐवजी ‘अब की बारी, महंगी हुई सवारी’ असे म्हणण्याची पाळी आली आहे. रेल्वे बोर्डाने प्रवासी भाड्यात मार्च महिन्याच्या अर्थसंकल्पात वाढ केली होती. त्यानंतर तीन महिन्यांचा कालावधीही उलटला नाही तोच रेल्वे बोर्डाने प्रवाशांवर पुन्हा भाडेवाढीचा बोझा टाकला आहे. रेल्वे बोर्डाने घेतलेल्या निर्णयानुसार आगामी २० मे पासून भाडेवाढीची अंमलबजावणी होणार आहे. यात मूळ रेल्वे भाड्याच्या १० टक्के अधिक रक्कम आणि ४.२ टक्के ‘फ्युअल अ‍ॅडजेस्टमेंट चार्ज’ अशी एकूण १४.२ टक्के भाडेवाढीला प्रवाशांना सामोरे जाण्याची पाळी आली आहे. रेल्वे बोर्डाच्या या निर्णयामुळे दूर अंतरावर प्रवास करणार्‍या प्रवाशांना मोठा फटका बसणार असून या भाडेवाढीचा मोठ्या प्रमाणात विरोध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Railway passengers will be affected by hike in fares