रेल्वेचा मेट्रो रेल्वेला आधार

By Admin | Updated: June 4, 2015 02:27 IST2015-06-04T02:27:01+5:302015-06-04T02:27:01+5:30

मध्य रेल्वेतील अधिकाऱ्यांना नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (एनएमआरसीएल) प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात येणार आहे.

Railway Metro Rail support | रेल्वेचा मेट्रो रेल्वेला आधार

रेल्वेचा मेट्रो रेल्वेला आधार

कर्तव्यदक्ष अधिकारी प्रतिनियुक्तीवर : मुख्यालयात अर्ज
वसीम कुरैशी नागपूर
मध्य रेल्वेतील अधिकाऱ्यांना नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (एनएमआरसीएल) प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात येणार आहे. ‘एनएमआरसीएल’ने मेट्रोसाठी दक्ष अधिकाऱ्यांची मागणी केली आहे. प्रतिनियुक्तीवर गेलेल्या अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळणार असल्याची माहिती आहे.
मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी कार्यरत ‘एनएमआरसीएल’ या कंपनीमध्ये रेल्वेचे कर्मचारी मोठ्या संख्येने पाठविण्यात येणार आहे. ‘एनएमआरसीएल’चे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी मध्य रेल्वे मंडळात विभागीय रेल्वे व्यवस्थापक पदाचा कार्यभार सांभाळला आहे. काम तत्परतेने व्हावे म्हणून ते आपल्या चमूत कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा समावेश करण्यास इच्छुक आहेत. सध्या मध्य रेल्वेतील ५० कर्मचाऱ्यांनी अर्ज केले आहेत. दक्षतेच्या चाचणीवर मंडळस्तरावर या अर्जाची छाननी करून मान्यतेसाठी मुख्यालयात पाठविण्यात येणार आहे. यामध्ये एस अ‍ॅण्ड टी, कमर्शियल, इंजिनिअरिंग, पर्सनल आदी विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. देशातील अन्य रेल्वे झोनमधील अधिकारीही मेट्रो रेल्वे प्रकल्पात प्रतिनियुक्तीवर येणार आहेत. ते तीन ते पाच वर्षांपर्यंत काम करतील.

Web Title: Railway Metro Rail support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.