रेल्वे रुग्णालय कोरोना रुग्णांसाठी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:12 IST2021-04-30T04:12:11+5:302021-04-30T04:12:11+5:30
नागपूर : नागपूर मंडळ मध्य रेल्वेच्या किंग्जवे, नागपूर स्टेशनजवळील रेल्वे रुग्णालय कोरोना रुग्णांसाठी जाहीर करण्यात आले आहे. हे रुग्णालय ...

रेल्वे रुग्णालय कोरोना रुग्णांसाठी जाहीर
नागपूर : नागपूर मंडळ मध्य रेल्वेच्या किंग्जवे, नागपूर स्टेशनजवळील रेल्वे रुग्णालय कोरोना रुग्णांसाठी जाहीर करण्यात आले आहे. हे रुग्णालय स्तर-२, डीसीएचसी म्हणून नोंदविण्यात आले आहे.
कोरोना संक्रमितांची संख्या नागपुरात दररोज वाढत आहे. यामुळे शहरातील रुग्णालयांमध्ये बेड अपुरे पडत आहेत. हे लक्षात घेता मंडळ रेल्वे रुग्णालयामध्ये १३ एप्रिलपासून कोरोना रुग्णांना दाखल करणे सुरू झाले आहे. सध्या जवळपास १८३ रुग्ण दाखल असून, यातील १२८ रुग्णांना ऑक्सिजन बेड आणि उर्वारित आयसीयू बेड आहेत. दुरुस्तीनंतर ७३ रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. देखभालीची गरज असणाऱ्या काही रुग्णांना संलग्नित रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. मध्य रेल्वे रुग्णालयाचा ओपीडी मागील १५ महिन्यात रात्रंदिवस चालला. याठिकाणी रोज सरासरी ७० ते ८० रुग्ण येतात. जवळपास ७ हजार रुग्णांनी आतापर्यंत फ्लू ओपीडीमध्ये मार्गदर्शन आणि उपचार घेतले आहेत.
याशिवाय रेल्वे मंडळ रुग्णालयात लसीकरण केंद्रही बनविण्यात आले आहे. येथे रेल्वेमधील आणि बाहेरील व्यक्तींना लस दिली जात आहे. या केंद्रावर आतापर्यंत ९,७०० लस डोस देण्यात आलेे आहेत. यातील ४,४८७ कर्मचाऱ्यांनी पहिला डोस, तर ४४१ कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. गैररेल्वे असलेल्या ३,३११ व्यक्तींनी पहिला, तर १,०२७ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. कोविड केअर सेंटरमधून वापरण्यासाठी मनपा आयुक्तांना ११ कोच उपलब्ध केले जातील. येथे रेल्वे कोच तयार केले जात आहेत. रुग्णांना उपचारासाठी आवश्यक असलेले ऑक्सिजन, औषधी, हँड सॅनिटायझर, अन्य सामान नागपुरातील मंडळ रेल्वे रुग्णालयातून उपलब्ध केले जात आहे.
...