शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

रुळावरून उतरले रेल्वे इंजिन : चाचेर स्थानकावरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 00:12 IST

शंटिंग इंजिन रेल्वे रुळावरून उतरल्याने सोमवारी मुंबई-हावडा मार्गावरील रेल्वेसेवा प्रभावित झाली. ही घटना दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर मंडळातील चाचेर रेल्वे स्थानकावर घडली.

ठळक मुद्देरेल्वेसेवा प्रभावित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शंटिंग इंजिन रेल्वे रुळावरून उतरल्याने सोमवारी मुंबई-हावडा मार्गावरील रेल्वेसेवा प्रभावित झाली. ही घटना दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर मंडळातील चाचेर रेल्वे स्थानकावर घडली.प्राप्त माहितीनुसार, नागपूरच्यावतीने कोळशाने भरलेली मालगाडी सोमवारी चाचेर स्थानकावर पोहचली. सायंकाळी सुमारे ५ वाजून १० मिनिटांच्या दरम्यान चाचेर स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर १ येथून चाचेर सायडिंगकडे घेऊन जाण्यासाठी या गाडीचे इंजिन काढून ‘शंटिंग’करीत मागे घेऊन जात असताना या इंजिनचे चारही चाक रुळाच्या खाली उतरले. यामुळे ‘मुंबई-हावडा अप-डाऊन लाईन’वर रेल्वे वाहतूक ठप्प पडली. एकीकडे ‘इतवारी-गोंदिया पॅसेंजर’ त्वरित रद्द करण्यात आली, तर दुसरीकडे प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र एक्स्प्रेसला इतवारी ते गोंदियापर्यंत प्रत्येक स्थानकावर थांबण्याचे आदेश देण्यात आले. यादरम्यान कामठी स्थानकावर हावडा- अहमदाबाद एक्स्प्रेसलाही दीड तासापेक्षा अधिक वेळपर्यंत थांबविण्यात आल्याची माहिती आहे. रेल्वे प्रशासनाकडून इंजिनला रुळावर आणण्याचे कार्य सुरू झाले होते. वृत्त लिहिपर्यंत मुंबई-हावडा अप लाईन सुरू झाली होती. परंतु ‘डाऊन लाईन’वर रेल्वे वाहतूक ठप्प होती.

 

टॅग्स :railwayरेल्वेAccidentअपघात