शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

रेल्वेची कॅशलेस सुविधा दोषपूर्ण; खात्यातून पैसे डेबिट, तिकीट मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 10:51 IST

तिकीट काढण्यासाठी गेल्यानंतर प्रवाशांचे पैसेही बँक खात्यातून कपात होत आहेत. परंतु हे पैसे रेल्वेच्या खात्यात जमा न झाल्यामुळे त्यास तिकीटही मिळत नाही, अशा तक्रारी वाढल्या आहेत.

ठळक मुद्देप्रवासी अन् बुकिंग क्लार्कमधील वाद वाढले

दयानंद पाईकराव।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कॅशलेस व्यवहार वाढावेत, प्रवाशांना जवळ पैसे न बाळगता रेल्वेचे तिकीट खरेदी करता यावे, यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात दोन वर्षांपूर्वी एटीएम, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डद्वारे स्वाईप मशीनच्या साह्याने तिकीट खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. परंतु अलीकडच्या काळात ही सुविधा प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. तिकीट काढण्यासाठी गेल्यानंतर प्रवाशांचे पैसेही बँक खात्यातून कपात होत आहेत. परंतु हे पैसे रेल्वेच्या खात्यात जमा न झाल्यामुळे त्यास तिकीटही मिळत नाही, अशा तक्रारी वाढल्या आहेत. यात प्रवाशांचा रेल्वेच्या बुकिंग क्लार्कसोबत वाद होत असून, ही सुविधा प्रवासी आणि रेल्वे बुकिंग क्लार्कसाठी डोकेदुखी ठरत आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात सुरुवातीला नागपूर रेल्वेस्थानकावर एटीएम, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डद्वारे स्वाईप मशीनने तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ही सुविधा विभागातील सर्वच आरक्षण केंद्रांवर उपलब्ध करण्यात आली. सुरुवातीला ही सुविधा विनाव्यत्यय सुरू राहिली. परंतु मागील आठ ते दहा महिन्यांपासून या सुविधेमुळे प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे. यात तिकीट काढण्यासाठी गेलेल्या प्रवाशाने आपले एटीएम, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, व्हिसा कार्ड, रुपीज कार्ड अशा तक्रारी वाढल्या आहेत. यात प्रवाशांचा रेल्वेच्या बुकिंग क्लार्कसोबत वाद होत असून, ही सुविधा प्रवासी आणि रेल्वे बुकिंग क्लार्कसाठी डोकेदुखी ठरत आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात सुरुवातीला नागपूर रेल्वेस्थानकावर एटीएम, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डद्वारे स्वाईप मशीनने तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ही सुविधा विभागातील सर्वच आरक्षण केंद्रांवर उपलब्ध करण्यात आली. सुरुवातीला ही सुविधा विनाव्यत्यय सुरू राहिली. परंतु मागील आठ ते दहा महिन्यांपासून या सुविधेमुळे प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे. यात तिकीट काढण्यासाठी गेलेल्या प्रवाशाने आपले एटीएम, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, व्हिसा कार्ड, रुपीज कार्ड, डिनर कार्ड, मास्टर कार्ड, मॅस्ट्रो कार्ड यापैकी एक कार्ड दिल्यानंतर ते स्वाईप मशीनमध्ये टाकताच प्रवाशाच्या खात्यातून पैसे कापल्या जात आहेत. परंतु ते पैसे तांत्रिक दोषामुळे रेल्वेच्या खात्यात जमा होत नाहीत. यामुळे आरक्षण काऊंटरवरील क्लर्क त्या प्रवाशाला तिकीट देत नाही. यात प्रवासी आणि संंबंधित रेल्वे कर्मचाऱ्यात वाद होत आहेत.

ऐनवेळी पैसे आणावेत कुठून?एखाद्या प्रवाशाच्या खात्यात दोन हजार रुपये आहेत आणि त्याने रेल्वेचे आरक्षणाचे तिकीट खरेदी करण्यासाठी आपले एटीएम कार्ड दिले. परंतु तांत्रिक दोषामुळे त्याच्या बँक खात्यातून पैसे कपात झाले अन् ते रेल्वेच्या खात्यात जमा झाले नाही, अशा वेळी तिकीट खरेदी करण्यासाठी पैसे कुठून आणावेत, असा प्रश्न प्रवाशांना पडत आहे.‘रेल्वेने स्वाईप मशिन अंतर्गत तयार केलेली यंत्रणा दोषपूर्ण आहे. यात प्रवासी आणि रेल्वे बुकिंग क्लार्कमध्ये वाद होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अशा सदोष यंत्रणेला सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचा विरोध आहे. रेल्वेने या यंत्रणेत सुधारणा न केल्यास संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.’- वीरेंद्र सिंग, विभागीय अध्यक्ष,सेंट्रल रेल्वे मजदूर संघ, नागपूर विभाग

‘प्रवाशांच्या हिताच्या दृष्टिकोनातून रेल्वेने स्वाईप मशिनद्वारे तिकीट देण्याची यंत्रणा सुरू केली. परंतु या यंत्रणेत प्रवाशांना त्रास होत आहे. रेल्वेने या यंत्रणेतील त्रुटी दूर करून प्रवाशांना दिलासा देण्याची गरज आहे. याशिवाय रेल्वेने आरक्षणाच्या काऊंटरची संख्या वाढवावी.’- बसंत कुमार शुक्ला, झोनल सदस्य, मध्य रेल्वे

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे