रेल्वे बुकिंग क्लर्क महिलेने दाखविले धाडस
By Admin | Updated: December 23, 2016 01:54 IST2016-12-23T01:54:16+5:302016-12-23T01:54:16+5:30
कामठी रेल्वेस्थानकावरील बुकिंग कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यावर असामाजिक तत्त्वांनी हल्ला केला.

रेल्वे बुकिंग क्लर्क महिलेने दाखविले धाडस
नागपूर : कामठी रेल्वेस्थानकावरील बुकिंग कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यावर असामाजिक तत्त्वांनी हल्ला केला. यावेळी संबंधित महिला कर्मचाऱ्याने आरोपींचा सामना करून त्यांना तेथून पिटाळून लावले. या महिला कर्मचाऱ्याने दाखविलेल्या धाडसाबद्दल दपूम रेल्वेचे ‘डीआरएम’ अमित कुमार अग्रवाल यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
कामठी रेल्वेस्थानकावर ७ डिसेंबरला रात्री ३ वाजताच्या दरम्यान महिला बुकिंग लिपिक छाया जनबंधू ड्युटीवर होत्या. काही असामाजिक तत्त्वांनी रुमालावर गुंगीचे औषध टाकून त्यांना बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी धाडस दाखवून या असामाजिक तत्त्वांचा विरोध करून त्यांना पिटाळून लावले.
यात ही महिला कर्मचारी जखमी झाली. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमित कुमार अग्रवाल यांनी या महिला कर्मचाऱ्याने दाखविलेल्या धाडसाबद्दल तिला प्रशस्तीपत्र, पाच हजार रुपये रोख देऊन तिचा गौरव केला. यावेळी विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अर्जुन सिबल उपस्थित होते. (प्रतिनिधी)