नागपुरात ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे सेवेला रेल्वे बोर्डाची हिरवी झेंडी : बृजेश दीक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 11:21 PM2019-11-27T23:21:36+5:302019-11-27T23:22:29+5:30

ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे सेवा प्रकल्पाला रेल्वे बोर्डाकडून हिरवी झेंडी मिळाली असून, या सेवेंतर्गत मेट्रो रेल्वे ब्रॉडगेज रेल्वे ट्रॅकवर १२० किमी वेगाने धावणार आहे.

Railway board's green flag for Broad gauge metro rail service in Nagpur: Brijesh Dixit | नागपुरात ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे सेवेला रेल्वे बोर्डाची हिरवी झेंडी : बृजेश दीक्षित

नागपुरात ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे सेवेला रेल्वे बोर्डाची हिरवी झेंडी : बृजेश दीक्षित

googlenewsNext
ठळक मुद्देकोच कारखान्याचा डीपीआर तयार

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे सेवा प्रकल्पाला रेल्वे बोर्डाकडून हिरवी झेंडी मिळाली असून, या सेवेंतर्गत मेट्रो रेल्वे ब्रॉडगेज रेल्वे ट्रॅकवर १२० किमी वेगाने धावणार आहे. प्रवाशांना इंटिग्रेटेड तिकीट आणि ट्रॅव्हल कार्डची सुविधा देण्यात येणार आहे. या प्रकल्पाला मंजुरी देताना रेल्वे बोर्डाने मध्य रेल्वे आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या झोनल कार्यालयाला महामेट्रोसोबत करार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचे प्रारूप तयार करण्यात येत आहे. त्यानंतर बीजी एसी कोचची खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी येथे दिली.
दर १५ मिनिटांनी प्रति तास ८० किमी वेगाने मेट्रो रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्याची सुरुवात बुधवारी झाली. त्यानंतर मेट्रो हाऊसमध्ये दीक्षित यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दीक्षित म्हणाले, नागपुरात मेट्रो कोचचा कारखाना सुरू करण्यासाठी डीपीआर तयार करण्यात आला आहे. हा डीपीआर मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे. कोच कारखान्यासाठी जमिनीची खरेदी अजूनही करण्यात आलेली नाही. त्याचा खर्चही मंजूर झालेला नाही.

डिसेंबर २०२० पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार
आतापर्यंत नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण होईल, असे सांगितले जात होते. पण बुधवारी दीक्षित यांनी याचा इन्कार करीत, प्रकल्पाचे काम डिसेंबर २०२० पूर्ण होणार असल्याचे सांगितले. त्यादिशेने बांधकाम वेगाने सुरू आहे.

Web Title: Railway board's green flag for Broad gauge metro rail service in Nagpur: Brijesh Dixit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.