अवैध दारूविक्री अड्ड्यांवर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:08 IST2021-04-05T04:08:38+5:302021-04-05T04:08:38+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क काटाेल : पाेलिसांनी काटाेल शहरातील पंचवटी भागाला लागून असलेल्या माेहल्ल्यातील चार अवैध दारूविक्री अड्ड्यावर धाडी टाकल्या. ...

Raids on illegal liquor dens | अवैध दारूविक्री अड्ड्यांवर धाड

अवैध दारूविक्री अड्ड्यांवर धाड

लाेकमत न्यूज नेटवर्क

काटाेल : पाेलिसांनी काटाेल शहरातील पंचवटी भागाला लागून असलेल्या माेहल्ल्यातील चार अवैध दारूविक्री अड्ड्यावर धाडी टाकल्या. यात १३,६२० रुपये किमतीच्या देशीदारूच्या २२७ बाटल्या जप्त केल्या. यात तिघांना अटक करण्यात आली असून, पळून गेलेल्या दाेन आराेपींचा पाेलीस शाेध घेत आहे. ही कारवाई शनिवारी (दि. ३) रात्री ८.१० वाजताच्या सुमारास करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये प्रेमसिंह कमरसिंग भादा, राणाछत्र सिंग या दाेघांसह एका महिलेचा समावेश असून, नंतर त्यांची सुटका करण्यात आली. शिवाय, जसबीर सिंग भोंड व गुरूबच्चन सिंग हे दाेघे पसार आहेत. काटाेल शहरातील पंंचवटी भागाला लागू असलेल्या माेहल्ल्या माेठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री केली जात असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या हाेत्या. त्याअनुषंगाने पाेलिसांच्या पथकाने शनिवारी रात्री या माेहल्ल्याची चार अवैध दारूविक्री अड्ड्यावर धाडी टाकल्या.

यात पाेलिसांनी दाेघांसह एका महिलेस ताब्यात घेत अटक केली आणि नंतर साेडून दिले. दाेघे मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती ठाणेदार महादेव आचरेकर यांनी दिली. शिवाय, या कारवाईमध्ये १३,६२० रुपये किमतीच्या देशीदारूच्या २२७ बाटल्या जप्त केल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पाेलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, सुनील ठोंबरे, संतोष आंधळे, गौरव आगरकर व ज्युली सावरकर यांच्या पथकाने केली.

Web Title: Raids on illegal liquor dens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.