‘हाॅटेल सहारा’मधील देहव्यापारावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:08 IST2021-04-16T04:08:18+5:302021-04-16T04:08:18+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : शहरातील माैदा राेडवर असलेल्या हाॅटेल सहारामध्ये देहव्यापार सुरू असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या ...

Raid on the sex trade in Hotel Sahara | ‘हाॅटेल सहारा’मधील देहव्यापारावर धाड

‘हाॅटेल सहारा’मधील देहव्यापारावर धाड

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : शहरातील माैदा राेडवर असलेल्या हाॅटेल सहारामध्ये देहव्यापार सुरू असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने धाड टाकली. यात एका महिलेस ताब्यात घेण्यात आले असून, दाेघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण २० हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली. ही कारवाई बुधवारी (दि.१४) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास करण्यात आली.

पवन अशोक चवरे (२५) व पंकज दिवाकर वरखडे (२४) दाेघेही रा. रामटेक, अशी अटकेतील आराेपींची नावे आहेत. शिवाय, २५ वर्षीय महिलेला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पाेलीस अधिकाऱ्यांनी दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बुधवारी सायंकाळी रामटेक परिसरात गस्तीवर हाेते. त्यांना रामटेक शहरातील माैदा मार्गालगत असलेल्या हाॅटेल सहारामध्ये देहव्यापार करवून घेतला जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे या पथकाने हाॅटेलमध्ये बनावट ग्राहक पाठवून चाचपणी करून घेतली.

बनावट ग्राहकाला हाॅटेलमध्ये देहव्यापार केला जात असल्याची खात्री पटताच त्याने पाेलिसांना सूचना केली आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लगेच धाड टाकली. यात त्यांनी पवन चवरे व पंकज वरखडे या दाेघांसह महिलेला ताब्यात घेतले. चाैकशीदरम्यान त्या हाॅटेलमध्ये देहव्यापार केला जात असल्याचे स्पष्ट झाल्याने पाेलिसांनी त्या दाेघांना अटक करून हाॅटेल मालकाविरुद्ध गुन्हा नाेंदविला. शिवाय, ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेला नागपूरला रवाना करण्यात आले. या आराेपींकडून एक हजार रुपये राेख, तीन माेबाईल हॅण्डसेट व इतर साहित्य असा एकूण २० हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली.

याप्रकरणी रामटेक पाेलिसांनी अनैतिक मानवी देहव्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३, ४, ५ व ७ अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला. ही कारवाई उपविभागीय पाेलीस अधिकारी नयन आलूरकर, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पाेलीस निरीक्षक राजीव कर्मलवार, उपनिरीक्षक सचिन मत्ते, हेड कॉन्स्टेबल नाना राऊत, विनोद काळे, शिपाई विपीन गायधने, अमोल वाघ, अश्विनी मोहोड, नीलेश बिजवाड यांच्या पथकाने केली.

Web Title: Raid on the sex trade in Hotel Sahara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.