माेहफुलाच्या दारूभट्टीवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:09 IST2021-03-31T04:09:03+5:302021-03-31T04:09:03+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क पारशिवनी : पाेलिसांनी नयाकुंड शिवारातील माेहफुलाच्या दारूभट्टीवर धाड टाकली. यात ११ हजार ३२० रुपये किमतीचा मुद्देमाल ...

माेहफुलाच्या दारूभट्टीवर धाड
लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : पाेलिसांनी नयाकुंड शिवारातील माेहफुलाच्या दारूभट्टीवर धाड टाकली. यात ११ हजार ३२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आराेपी पळून गेल्याने त्यांचा शाेध सुरू असल्याची माहिती ठाणेदार संताेष वैरागडे यांनी दिली. ही कारवाई रविवारी (दि. २८) रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
विजय गणपत मेश्राम व दिलीप संपत मेश्राम, दाेघेही रा. नयाकुंड, ता. पारशिवनी अशी पसार आराेपींची नावे आहेत. पारशिवनी पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना नयाकुंड शिवारात माेहफुलाची दारू काढली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे पाेलिसांनी लगेच या शिवाराची पाहणी केली. या शिवारातील नील नाल्याच्या काठी पाेलिसांना दारूभट्टी आढळून येताच त्यांनी धाड टाकली. मात्र, पाेलिसांना पाहताच आराेपी विजय मेश्राम व दिलीप मेश्राम या दाेघांनीही अंधाराचा फायदा घेत जंगालाच्या दिशेने पळ काढला.
या कारवाईमध्ये पाेलिसांनी ४० लिटर माेहफुलाची दारू, ७० किलाे माेहफुलाचा सडवा (रसायन) आणि दारू काढण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले आणि दारू व सडवा घटनास्थळीच नष्ट केला. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ११ हजार ३२० रुपये असून, पसार आराेपीस लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती ठाणेदार संताेष वैरागडे यांनी दिली. याप्रकरणी पारशिवनी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पाेलीस उपनिरीक्षक पळनाटे, हवालदार संजय शिंदे यांच्या पथकाने केली.