माेहफुलाच्या दारूभट्टीवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:12 IST2021-03-13T04:12:36+5:302021-03-13T04:12:36+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क पाटणसावंगी : सावनेर पाेलिसांनी पाटणसावंगी (ता. सावनेर) शिवारातील माेहफुलाच्या दारूभट्टीवर धाड टाकली. यात एकास ताब्यात घेण्यात ...

माेहफुलाच्या दारूभट्टीवर धाड
लाेकमत न्यूज नेटवर्क
पाटणसावंगी : सावनेर पाेलिसांनी पाटणसावंगी (ता. सावनेर) शिवारातील माेहफुलाच्या दारूभट्टीवर धाड टाकली. यात एकास ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून एकूण १ लाख २५ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (दि. ९) दुपारी करण्यात आली.
सावनेर पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना पाटणसावंगी शिवारात माेहफुलाची दारूभट्टी सुरू असून, तिथे दारू काढली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे पाेलिसांनी या शिवाराची पाहणी केली. त्यांना नाल्याच्या काठी असलेल्या झुडपांमध्ये दारूची भट्टी आढळून येताच धाड टाकली आणि मिलिंद हेमराज धापोळकर (३४, रा. पाटणसावंगी, ता. सावनेर) यास ताब्यात घेतले.
त्याच्याकडून २५० लिटर माेहफुलाची दारू, ४५० लिटर दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे रसायन (सडवा) व दारू गाळण्याचे साहित्य जप्त करून ते घटनास्थळीच नष्ट करण्यात आले. या कारवाईमध्ये एकूण १ लाख २४ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, अशी माहिती ठाणेदार मारुती मुळूक यांनी दिली. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर, संदीप नागरे, हेमराज काेल्हे यांच्या पथकाने केली.