अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:11 IST2021-01-03T04:11:02+5:302021-01-03T04:11:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - मोठ्या सिलिंडरमधून अनधिकृतपणे छोट्या सिलिंडरमध्ये गॅस भरणाऱ्या आणि त्याची अवैध विक्री करणाऱ्या गॅस रिफिलिंग ...

Raid on illegal gas refilling center | अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर छापा

अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर छापा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - मोठ्या सिलिंडरमधून अनधिकृतपणे छोट्या सिलिंडरमध्ये गॅस भरणाऱ्या आणि त्याची अवैध विक्री करणाऱ्या गॅस रिफिलिंग सेंटरवर गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी छापा मारला. या छाप्यात पोलिसांनी ११० सिलिंडर तसेच गॅस रिफिलिंगची मशीनसह साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त केला.

आरोपी युनिस खान हफीज खान (वय ३२, रा. बाबा ताजनगर, खरबी) याने गोरेवाड्यातील पलोटीनगरात राहणारे रसिद खान यांच्या घरी अवैध गॅस रिफिलिंग सेंटर सुरू केले होते. मशीनचा वापर करून तो मोठ्या सिलिंडरमधील गॅस छोट्या सिलिंडरमध्ये भरत होता. गॅस गळती होऊन आग लागण्याची आणि स्फोट होण्याचा तसेच धोका त्याने निर्माण केला होता. स्वत:सोबत परिसरातील नागिरकांचेही जीव आरोपी युनिसने धोक्यात घातले होते. ही माहिती कळताच गुन्हे शाखेच्या युनिट-२ च्या पथकाने तेथे शुक्रवारी सायंकाळी ६ च्या सुमारास छापा घातला. या छाप्यात छोटे-मोठे आणि व्यावसायिक सिलिंडरसह विविध कंपनी आणि वजनाचे एकूण ११० सिलिंडर, गॅस भरण्याची मशीन आणि सिलिंडर वाहून नेण्याकरिता वापरले जाणारे वाहन असा एकूण ५ लाख ४७ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आरोपी युनिसविरुद्ध विविध कलमानुसार मानकापूर ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.

---

Web Title: Raid on illegal gas refilling center