शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या पाचपावलीतील हुक्का पार्लरमध्ये छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 00:36 IST

कमाल चौकातील फिरंगी हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने बुधवारी रात्री छापा टाकला. येथे पोलिसांनी नशेत झिंगणाऱ्या १० अल्पवयीन मुलामुलींसह ३० जणांना ताब्यात घेतले.

ठळक मुद्देफिरंगी हॉटेलमध्ये कारवाई : १० अल्पवयीन मुलामुलींसह ३० जण ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कमाल चौकातील फिरंगी हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने बुधवारी रात्री छापा टाकला. येथे पोलिसांनी नशेत झिंगणाऱ्या १० अल्पवयीन मुलामुलींसह ३० जणांना ताब्यात घेतले.कुख्यात गुंड सुमित मोरयानी याच्या मालकीचे कमाल चौकात फिरंगी हॉटेल अ‍ॅन्ड रेस्टॉरंट आहे. या हॉटेलमध्ये जेवणासह हुक्का पार्लरचीही व्यवस्था आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून फिरंगी हॉटेलमध्ये युवक आणि युवतींची वर्दळ राहायची. ही माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त नीलेश भरणे यांना मिळाली. बुधवारी त्यांनी दोन पंटर पाठवून शहानिशा केली. त्यानंतर रात्री ८ च्या सुमारास अचानक छापा घातला. या छाप्यात हुक्क्याच्या नशेत झिंगत असलेले १० अल्पवयीन विद्यार्थी आणि २० अन्य जण आढळले. तेथून पोलिसांनी हुक्क्याचे पॉट, वेगवेगळे सुगधी तंबाखूचे बॉक्स आणि अन्य साहित्य जप्त केले.विशेष म्हणजे, राज्यात हुक्का बंदीसंबंधीचा कायदा कठोर झाल्यानंतर उपराजधानीतील अनेक ठिकाणचे हुक्का पार्लर बंद पडले. मात्र, अनेक ठिकाणी अद्यापही हुक्का पार्लर सुरू आहेत. त्यात विद्यार्थी आणि मोठ्या संख्येत तरुणी धूर उडवताना दिसतात. या छाप्यात उच्चभ्रू परिवारातील पाच तरुणी हुक्क्याच्या धुरात संगीताच्या तालावर थिरकत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीसाठी सर्वांना शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. उशिरा रात्रीपर्यंत या संबंधाने कारवाई सुरू असल्याने सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र, या कारवाईला पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी दुजोरा दिला आहे.

 

टॅग्स :raidधाडPoliceपोलिस