शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील फिरंगी कॅफेमधील हुक्का पार्लरवर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 01:02 IST

कमाल चौकातील फिरंगी कॅफे अ‍ॅन्ड लाऊंजमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने बुधवारी रात्री छापा टाकला. येथे पोलिसांनी हुक्क्याचा धूर उडविणाऱ्या १० अल्पवयीन मुलामुलींसह २५ जणांना ताब्यात घेतले.

ठळक मुद्देअल्पवयीन मुलामुलींसह २५ जण ताब्यात : कुख्यात मोरयानीसह तिघांवर गुन्हा, गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कमाल चौकातील फिरंगी कॅफे अ‍ॅन्ड लाऊंजमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने बुधवारी रात्री छापा टाकला. येथे पोलिसांनी हुक्क्याचा धूर उडविणाऱ्या १० अल्पवयीन मुलामुलींसह २५ जणांना ताब्यात घेतले.कुख्यात गुंड सुमित परमानंद मोरयानी (वय २७), सौरभ गोपाल घोगे (वय २२, रा. राणी दुर्गावती चौक) आणि हिमांशु रंजित गायकवाड (वय २२, रा. शेंडेनगर, टेका नाका) हे तिघे कमाल चौकातील इमारतीच्या चौथ्या माळ्यावर फिरंगी कॅफे अ‍ॅन्ड लाऊंज चालवीत होते. येथे जेवणासह हुक्का पार्लरचीही व्यवस्था असल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून फिरंगीत युवक आणि युवतींची वर्दळ राहायची. ही माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त नीलेश भरणे यांना मिळाली. बुधवारी त्यांनी दोन पंटर पाठवून शहानिशा केली. त्यानंतर रात्री ८ च्या सुमारास अचानक छापा घातला. या छाप्यात हुक्क्याच्या नशेत झिंगत असलेले १० अल्पवयीन विद्यार्थी आणि २० अन्य जण आढळले. तेथून पोलिसांनी हुक्क्याचे १० पॉट, वेगवेगळे सुगंधी तंबाखूचे बॉक्स आणि अन्य साहित्य जप्त केले. त्यानंतर मोरयानी, घोगे तसेच गायकवाडविरुद्ध पाचपावली ठाण्यात कलम ४(अ), २१ (अ) कोप्टा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेचे उपायुक्त नीलेश भरणे, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे, सहायक निरीक्षक मेश्राम, उपनिरीक्षक मयूर चौरसिया, संजय मिश्रा, एएसआय महेंद्र थोटे, हवालदार राजेश यादव, मंगेश लांडे, प्रशांत लांडे, अजय बघेल, नायक अरुण चांदणे, दिनेश चाफलेकर, रवी शाहू, नरेंद्र ठाकूर, उत्कर्ष राऊत, सचिन आंधळे आणि फराज खान यांनी ही कामगिरी बजावली.बंदी असूनही नागपुरात हुक्का सुरूचविशेष म्हणजे, राज्यात हुक्काबंदीसंबंधीचा कायदा कठोर झाल्यानंतर उपराजधानीतील अनेक ठिकाणचे हुक्का पार्लर बंद पडले. मात्र, अनेक ठिकाणी अद्यापही हुक्का पार्लर सुरू आहेत. त्यात विद्यार्थी आणि मोठ्या संख्येत तरुणी धूर उडवताना दिसतात. या छाप्यात उच्चभ्रू परिवारातील पाच तरुणी हुक्क्याच्या धुरात संगीताच्या तालावर थिरकत असताना दिसल्या. पोलिसांनी त्यांची चौकशी करून त्यांना मुक्त केले.

 

 

टॅग्स :Policeपोलिसraidधाड