शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात हाय प्रोफाईल कुंटणखान्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 22:06 IST

पाचपावलीतील राय सोसायटीत सोमवारी सायंकाळी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने (एसएसबी) छापा घालून हाय प्रोफाईल कुंटणखाना उजेडात आणला. या कुंटणखान्यावर बांगला देशातील दोन आणि छत्तीसगडमधील एक अशा तीन वारांगना देहविक्रय करताना पोलिसांच्या हाती लागल्या.

ठळक मुद्देबांगला देशातील दोन वारांगनांसह तिघी सापडल्या : कुंटणखाना चालविणाऱ्यास अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाचपावलीतील राय सोसायटीत सोमवारी सायंकाळी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने (एसएसबी) छापा घालून हाय प्रोफाईल कुंटणखाना उजेडात आणला. या कुंटणखान्यावर बांगला देशातील दोन आणि छत्तीसगडमधील एक अशा तीन वारांगना देहविक्रय करताना पोलिसांच्या हाती लागल्या.कोराडी नाक्याजवळच्या ओम सोसायटीत राहणारा मोहम्मद सरफराज इलियाज मेमन याने मोतीबाग रेल्वे क्रॉसिंगजवळच्या राय सोसायटीत ११० क्रमांकाचा फ्लॅट भाड्याने घेतला होता. या ठिकाणी सरफराज हाय प्रोफाईल कुंटणखाना चालवीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाला सोमवारी मिळाली. शहानिशा केल्यानंतर बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी सरफराजसोबत संपर्क साधला. त्याने आपल्याकडे देशी-विदेशी वारांगना उपलब्ध असल्याचे सांगून, त्यांचे मोबाईलमध्ये फोटोही दाखविले. त्यातील एकीचा सौदा केल्यानंतर सरफराजला पैसे देऊन ग्राहकाने तिला आतल्या रूममध्ये नेले. त्यानंतर काही वेळेनंतर तेथे पोलीस पथक धडकले. यावेळी पोलिसांना तेथे दोन बांगला देशी आणि एक रायपूर(छत्तीसगड)मधील वारांगना मिळाली. आरोपी मेमनने त्यांना नोकरीचे आमिष दाखवून १५ दिवसांपूर्वी नागपुरात बोलवून घेतले. तेव्हापासून तो त्या तिघींकडून वेश्याव्यवसाय करवून घेत होता, असे त्या तिघींनी पोलिसांना सांगितले. त्यावरून पोलिसांनी मेमनविरुद्ध पाचपावली पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पोलीस उपायुक्त नीलेश भरणे, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर, सहायक निरीक्षक अनुपमा जगताप, उपनिरीक्षक स्मिता सोनावणे, प्रीती कुळमेथे, हवालदार मुकुंदा गारमोडे, संजय पांडे, मनोजसिंग चौहाण, चंद्रशेखर घागरे, प्रफुल्ल बोंदरे, प्रल्हाद डोळे, सुरेखा सांडेकर, छाया राऊत, साधना चव्हाण, अनिल दुबे, अनिल मारकड तसेच सामाजिक कार्यकर्त्या सविता रेलकर, विजयाराणी रेड्डी यांनी ही कामगिरी बजावली.

टॅग्स :raidधाडSex Racketसेक्स रॅकेटnagpurनागपूर