दुधामांगली शिवारातील जुगारावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:11 IST2021-08-13T04:11:58+5:302021-08-13T04:11:58+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क बुटीबाेरी : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुटीबाेरी (ता. नागपूर ग्रामीण) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील दुधामांगली शिवारातील जुगारावर ...

Raid on gambling in Dudhamangali Shivara | दुधामांगली शिवारातील जुगारावर धाड

दुधामांगली शिवारातील जुगारावर धाड

लाेकमत न्यूज नेटवर्क

बुटीबाेरी : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुटीबाेरी (ता. नागपूर ग्रामीण) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील दुधामांगली शिवारातील जुगारावर छापा टाकून सहा जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून राेख रक्कम, कार, माेटारसायकली असा एकूण आठ लाख २९ हजार ४८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली. ही कारवाई मंगळवारी (दि. १०) सायंकाळी करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या जुगाऱ्यांमध्ये अजय राजेंद्र बागडे (३०), स्वप्निल पुरुषाेत्तम बारसिंगे (२६), अनिकेत ऊर्फ पंडा रामदास दुबे (३०), मनाेहर मुन्ना बघिया (२३) सर्व रा. नागपूर, चंदू ढेंगरे (४५, रा. बुटीबाेरी, ता. नागपूर ग्रामीण) व गाेपाल माराेतराव भलावी (४४, रा. आसाेला, ता. हिंगणा) या सहाजणांचा समावेश आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बुटीबाेरी परिसरात गस्तीवर असताना त्यांना दुधामांगली शिवारात जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी या भागाची पाहणी केली. तिथे जुगार आढळून येताच या पथकाने लगेच छापा टाकला व जुगार खेळणाऱ्या सहाजणांना ताब्यात घेऊन अटक केली.

त्यांच्याकडून ३० हजार ८३० रुपये राेख, एक कार, दाेन माेटारसायकली, एक ॲक्टिव्हा, पाच माेबाईल फाेन व जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण आठ लाख २९ हजार ४८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली बसून, आराेपींना बुटीबाेरी पाेलिसांच्या स्वाधीन केल्याचे त्यांनी सांगितले.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पाेलीस निरीक्षक जितेंद्र वैरागडे, हवालदार गजेंद्र चाैधरी, महेश जाधव, रामराव आडे, अमृत किनगे यांच्या पथकाने केली. या प्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.

Web Title: Raid on gambling in Dudhamangali Shivara