कामठीतील जुगार अड्ड्यावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:10 IST2021-06-09T04:10:33+5:302021-06-09T04:10:33+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : शहरातील खलाशी लाइन भागातील एका घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर जुनी कामठी पाेलिसांनी धाड ...

कामठीतील जुगार अड्ड्यावर धाड
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : शहरातील खलाशी लाइन भागातील एका घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर जुनी कामठी पाेलिसांनी धाड टाकून सहा जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून ५६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई साेमवारी (दि.७) रात्री ९ वाजताच्या सुमारास केली.
अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये शुभम विजय पाटील (२१), समीर अनिल डाेंगरे (२०), रजत प्रमाेद गजभिये (२५), सुशील सुधीर शेंडे (२१), सय्यद रेहान सय्यद मुमताज (२७, सर्व रा. नागसेन नगर, कामठी) व अकील खान जहीर खान (३२, रा. कादर झेंडा, कामठी) यांचा समावेश आहे. खलाशी लाइन परिसरातील सुशील शेंडे याच्या घरी पत्त्यांवर पैशांचा जुगार खेळला जात असल्याची गुप्त सूचना पाेलिसांना मिळाली. त्याआधारे पाेलिसांनी तेथे धाड टाकून सर्व आराेपींना ताब्यात घेत अटक केली. या कारवाईत राेख आठ हजार रुपये, चार माेबाइल हॅण्डसेट व जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण ५६ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी कामठी (जुनी) पाेलिसांनी कलम ४, ५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नाेंदवून आराेपींना अटक केली आहे. ही कारवाई ठाणेदार राहुल शिरे यांच्या मार्गदर्शनात फैजूर रहेमान, महेश कठाणे, पंकज मारसिंगे, विजय शुभेकर, स्वाती चेटाेळे यांच्या पथकाने केली.