जुगार अड्ड्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:27 IST2020-12-16T04:27:20+5:302020-12-16T04:27:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कुही : पोलिसांनी साळवा नेवरी शिवारातील जुगार अड्ड्यावर धाड टाकून चार जुगाऱ्यांना ताब्यात घेत अटक केली. ...

Raid on a gambling den | जुगार अड्ड्यावर धाड

जुगार अड्ड्यावर धाड

लोकमत न्यूज नेटवर्क

कुही : पोलिसांनी साळवा नेवरी शिवारातील जुगार अड्ड्यावर धाड टाकून चार जुगाऱ्यांना ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम, दाेन दुचाकी, मोबाईल हॅण्डसेट आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख ४६ हजार ६५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई साेमवारी (दि. १४) दुपारी १२.३५ वाजताच्या सुमारास करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शेषराव वनवासजी लांडगे (२१, रा. सावरगाव), आकाश रतनजी खेडेकर (२१, रा. नेवरी), विजय देवराव मेहर (४०, रा. साळवा) व राहुल सुरेश मेश्राम (३०, रा. सावरगाव) यांचा समावेश आहे. साळवा नेवरी शिवारात जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी लगेच धाड टाकली आणि जुगार खेळणाऱ्या चार जणांना ताब्यात घेत अटक केली.

त्यांच्याकडून ३,६०० रुपये रोख, चार मोबाईल हॅण्डसेट, दाेन दुचाकी वाहने आणि जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण १ लाख ४६ हजार ६५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कुही पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई ठाणेदार मदने, सहायक पाेलीस निरीक्षक साेनटक्के यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.

Web Title: Raid on a gambling den