घाेतीवाडा शिवारातील दारूभट्टीवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:08 IST2021-03-17T04:08:59+5:302021-03-17T04:08:59+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : पाेलिसांच्या पथकाने घाेतीवाडा (ता. काटाेल) शिवारातील माेहफुलाच्या दारूभट्टीवर धाड टाकली. यात दारू काढणाऱ्या आराेपीस ...

घाेतीवाडा शिवारातील दारूभट्टीवर धाड
लाेकमत न्यूज नेटवर्क
काेंढाळी : पाेलिसांच्या पथकाने घाेतीवाडा (ता. काटाेल) शिवारातील माेहफुलाच्या दारूभट्टीवर धाड टाकली. यात दारू काढणाऱ्या आराेपीस अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून एकूण ८१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (दि. १६) दुपारी ३ वाजेच्या सुमारास करण्यात आली.
विक्की बाबाराव ढोके (३५, रा. घोतीवाडा, ता. काटोल) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. मागील काही दिवसांपासून काेंढाळी (ता. काटाेल) व परिसरातील गावांमध्ये माेहफुलाच्या अवैध दारूविक्रीमध्ये माेठी वाढ झाली आहे. त्यातच काेंढाळी परिसरातून वर्धा जिल्ह्यात माेहफुलाची दारू नेली जात असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. त्यामुळे पाेलिसांनी घाेतीवाडा शिवाराची पाहणी करायला सुरुवात केली.
यात त्यांना जंगलालगत असलेल्या झाेपडीत माेहफुलाची दारूभट्टी आढळून आली. त्यामुळे त्यांनी लगेच धाड टाकून दारू काढणाऱ्या विक्की ढाेके यास अटक केली. शिवाय, त्याच्याकडून ५० लिटर माेहफुलाची दारू, ६०० लिटर माेहफुलाचा सडवा (दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे रसायन) व इतर साहित्य असा एकूण ८१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. दारू व सडवा घटनास्थळीच नष्ट करण्यात आला, अशी माहिती ठाणेदार विश्वास फुल्लरवार यांनी दिली.
याप्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई हेडकाॅन्स्टेबल बाबुलाल राठोड, रणजित जाधव, कानिफ जाधव, पन्नालाल बटाऊवाले, माधव गुट्टे, राजेश वासनकर यांच्या पथकाने केली. या भागातील अवैध दारूविक्री कायम बंद करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.