चांपा शिवारातील दारूभट्टीवर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:09 IST2021-04-28T04:09:03+5:302021-04-28T04:09:03+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : पाेलिसांनी चांपा शिवारातील माेहफुलाच्या दारूभट्टीवर धाड टाकली. यात आराेपी पळून गेल्याने कुणालाही अटक करण्यात ...

Raid on a distillery in Champa Shivara | चांपा शिवारातील दारूभट्टीवर धाड

चांपा शिवारातील दारूभट्टीवर धाड

लाेकमत न्यूज नेटवर्क

कुही : पाेलिसांनी चांपा शिवारातील माेहफुलाच्या दारूभट्टीवर धाड टाकली. यात आराेपी पळून गेल्याने कुणालाही अटक करण्यात आली नाही. मात्र, ३ लाख ४६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई नुकतीच करण्यात आली.

चांपा शिवारात माेहफुलाची दारू काढली जात असल्याची माहिती कुही पाेलिसांना मिळाली हाेती. त्यामुळे पाेलिसांच्या पथकाने या भागाची पाहणी केली. मात्र, पाेलीस येत असल्याची कुणकुण लागल्याने आराेपींनी तिथून लगेच पळ काढला. पाेलिसांना या शिवारात सहा ठिकाणी माेहफुलाच्या दारूभट्ट्या आढळून आल्याने त्यांनी त्या उद्ध्वस्त केल्या आणि एकूण ३ लाख ४६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

यात पहिल्या ठिकाणाहून ५० हजार रुपयाचा सडवा, पाच हजार रुपयाचे साहित्य, दुसऱ्या ठिकाणाहून ५५ हजार रुपयाचा सडवा व ५,५०० रुपयाचे इतर साहित्य, तिसऱ्या ठिकाणाहून ५० हजार रुपयाचा सडवा व पाच हजार रुपयाचे साहित्य, चाैथ्या ठिकाणाहून ५५ हजार रुपयाचा सडवा व ५,५०० रुपयाचे साहित्य, पाचव्या ठिकाणाहून ५५ हजार रुपयाचे रसायन व ५,५०० रुपयाचे साहित्य, सहाव्या ठिकाणाहून ५० हजार रुपयाचा सडवा व पाच हजार रुपयाचे इतर साहित्य असा एकूण ३ लाख ४६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती पाेलीस अधिकाऱ्यांनी दिली. याप्रकरणी कुही पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.

Web Title: Raid on a distillery in Champa Shivara