दाेन लाॅनवर धाड, १८ वऱ्हाड्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:09 IST2021-02-24T04:09:47+5:302021-02-24T04:09:47+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : महसूल, पाेलीस व नगर परिषद प्रशासनाने काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करायला ...

Raid on Daen Lawn, action on 18 brides | दाेन लाॅनवर धाड, १८ वऱ्हाड्यांवर कारवाई

दाेन लाॅनवर धाड, १८ वऱ्हाड्यांवर कारवाई

लाेकमत न्यूज नेटवर्क

सावनेर : महसूल, पाेलीस व नगर परिषद प्रशासनाने काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करायला सुरुवात केली आहे. या संयुक्त पथकाने मंगळवारी (दि. २३) शहरातील तीन वेगवेगळ्या लाॅनवर धाडी टाकून तेथील वऱ्हाड्यांची तपासणी केली. त्यात मास्क न वापरणाऱ्या १८ वऱ्हाड्यांसह २५ वाटसरूंवर दंडात्मक कारवाई केली. यात त्यांच्याकडून एकूण १९ हजार ५०० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी दिनेश बुधे यांनी दिली.

या पथकाने सावनेर शहरातील तीन लाॅनवर धाडी टाकल्या. यात त्यांनी पहिल्यांदा जनता लाॅन व नंतर बालाजी सेलिब्रशन लॉनची पाहणी केली. दाेन्ही लाॅनमध्ये अनेकांनी मास्क वापरला नव्हता. मात्र, पथकातील अधिकाऱ्यांना पाहताच पटापट मास्क घालायला सुरुवात केली. यात पथकाने जनता लाॅनमध्ये १२ तर बालाजी सेलिब्रशन लॉनमध्ये सहा वऱ्हाड्यांवर मास्क न वापरल्याने प्रत्येकी ५०० रुपयाचा दंड ठाेठावत त्यांच्याकडून एकूण नऊ हजार रुपयाचा दंड वसूल केला.

याच पथकाने शहरातील विविध दुकाने व बाजारपेठेचीही पाहणी केली. त्यात त्यांनी विना मास्क फिरणाऱ्या २५ जणांवर दंडात्मक कारवाई करीत त्यांच्याकडून एकूण १० हजार ५०० रुपयाचा दंड वसूल केला. ही माेहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासन अधिकारी दिनेश बुधे यांनी सांगितले. या पथकात दिनेश बुधे, जयसिंग राठोड, पंकज छेनिया, धीरज देशमुख, मधुकर लोही, प्रदीप गवई, नीलेश नकाशे, सूरज ढोके, जितू जीवतोडे, शंकर चापेकर यांचा समावेश हाेता.

...

४० रुग्ण आढळले

सावनेर तालुक्यात काेराेनाचे साेमवारी (दि.२२) ३२ तर मंगळवारी (दि.२३) ४० नवीन रुग्ण आढळले. सावनेर येथील काेविड सेंटरमध्ये राेज २५० ते ३०० नागरिकांची टेस्ट केली जात असल्याची माहिती शासकीय रुग्णालयाचे प्रपाठक डॉ. पवन मेश्राम यांनी दिली. मंगळवारी आढळून आलेल्या नवीन रुग्णांमध्ये सावनेर शहरातील २२, तालुक्यातील पाटणसावंंगी येथील १०, चिचोली (खापरखेडा) येथील चार, खापा येथील दाेन तसेच बडेगाव व केळवद येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. यातील एक रुग्ण सावनेर तालुक्याबाहेरील आहे.

Web Title: Raid on Daen Lawn, action on 18 brides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.