मानकापुरातील सट्टा अड्ड्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:08 IST2021-02-25T04:08:57+5:302021-02-25T04:08:57+5:30

नागपूर : मानकापूर येथील संत ज्ञानेश्वर सोसायटी येथे एका घरात सुरू असलेल्या सट्टा अड्ड्यावर झोन क्रमांक २ च्या उपायुक्तांच्या ...

Raid on a betting den in Mankapur | मानकापुरातील सट्टा अड्ड्यावर धाड

मानकापुरातील सट्टा अड्ड्यावर धाड

नागपूर : मानकापूर येथील संत ज्ञानेश्वर सोसायटी येथे एका घरात सुरू असलेल्या सट्टा अड्ड्यावर झोन क्रमांक २ च्या उपायुक्तांच्या विशेष पथकाने धाड घालून पाच आरोपींना अटक केली आहे. आरोपींच्या ताब्यातून १ लाख २८ हजार ७३० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

संत ज्ञानेश्वर सोसायटी येथे राहणारा रहमान शरीफ बेग (६३) हा आपल्या घरी सट्टा अड्डा चालवितो, अशी माहिती पोलीस पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून मंगळवारी सायंकाळी विशेष पथकाने सापळा रचून या अड्ड्यावर धाड घातली. या धाडीत रहमान शरीफ बेग (६३), इमरान रहमान बेग (२९), जफरखान मो. रियाज खान (४५), अब्दुल रहमान शेख (५५) दोन्ही रा. ताजनगर, मानकापूर आणि समीर सय्यद रफीक सय्यद (३५) असे पाच आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून रोख ३१ हजार ५०० रुपये आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख २८ हजार ७३० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. त्यावरून पोलिसांनी मानकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला. ही कारवाई सहायक निरीक्षक दिलीप चंदन व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

.........

Web Title: Raid on a betting den in Mankapur