शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

पुणे पोलिसांचा नागपुरात वकिलाच्या घरी छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 22:28 IST

भीमा कोरेगाव दंगलीची चिथावणी दिल्याचा ज्या एल्गार परिषदेच्या आयोजकांवर संशय आहे, त्या आयोजकांसोबत संबंध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी येथील अ‍ॅड.सुरेंद्र गडलिंग यांच्या घरी मंगळवारी पहाटे छापा घातला. पुणे पोलिसांच्या विशेष पथकांतीलअधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने अ‍ॅड. गडलिंग यांच्या घरात तब्बल आठ तास तपासणी केली.

ठळक मुद्देभीमा कोरेगाव प्रकरण : एल्गार परिषदेसोबतच्या संबंधाची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भीमा कोरेगाव दंगलीची चिथावणी दिल्याचा ज्या एल्गार परिषदेच्या आयोजकांवर संशय आहे, त्या आयोजकांसोबत संबंध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी येथील अ‍ॅड.सुरेंद्र गडलिंग यांच्या घरी मंगळवारी पहाटे छापा घातला. पुणे पोलिसांच्या विशेष पथकांतीलअधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने अ‍ॅड. गडलिंग यांच्या घरात तब्बल आठ तास तपासणी केली.विशेष म्हणजे, अ‍ॅड. गडलिंग गेल्या २० वर्षांपासून नक्षलवाद्यांशी संबंधित केसेस लढवतात. नागपूर-विदर्भातील फ्रंटल आॅर्गनायझेशनवर नक्षलविरोधी अभियान तसेच स्थानिक पोलीस अनेक वर्षांपासून नजर ठेवून आहे. गडचिरोली-गोंदियातील एल्गार परिषद तसेच अन्य फ्रंटल आॅर्गनायझेशनने पुणे, मुंबई, नाशिकसह विविध ठिकाणी जाळे विणल्याच्या अधून मधून बातम्या येतात. पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेसाठी जमविण्यात आलेल्या निधीपैकी काही निधी नागपुरातून गेल्याचा संशय आहे. भीमा कोरेगाव प्रकरणात उसळलेल्या दंगलीत एल्गार परिषदेने भूमिका वठविल्याचा पुणे पोलिसांना संशय आहे. या पार्श्वभूमीवर अ‍ॅड. गडलिंग यांचा एल्गार परिषदेशी काही संबंध आहे का, ते तपासण्यासाठी पुणे पोलिसांचे विशेष पथक मंगळवारी पहाटे नागपुरात धडकले. त्यांनी स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून अ‍ॅड. गडलिंग यांच्या भीम चौकाजवळच्या मंगळवारी बाजार (जरीपटका) येथील निवासस्थानी पहाटे ५ वाजता छापा घातला. तब्बल आठ तास तपासणी केल्यानंतर येथून पोलिसांनी काही कागदपत्रे, सीडीज, हार्डडिस्क आणि पेन ड्राईव्ह ताब्यात घेतले. तब्बल १ वाजेपर्यंत ही कारवाई चालली. कारवाईत व्यत्यय येऊ नये म्हणून अ‍ॅड. गडलिंग यांच्या घराच्या चारही बाजूने प्रचंड पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलीस उपायुक्त सुहास बावचे हेदेखील कारवाई संपेपर्यंत तेथे हजर होते. दरम्यान, ही माहिती कळताच अ‍ॅड. गडलिंग यांचे समर्थक, वकील मित्र मोठ्या संख्येत गोळा झाले.छाप्याची पार्श्वभूमीपुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी एल्गार परिषद झाली होती. त्यानंतर १ जानेवारी २०१८ ला कोरेगाव भीमा इथे हिंसाचार उफाळला होता. त्याच्या निषेधार्थ दलित संघटनांनी ३ जानेवारीला राज्यभरात बंद पुकारला होता. या पार्श्वभूमीवर, जमावाला भडकाविण्याचा आरोप एल्गार परिषदेच्या आयोजकांवर लावण्यात आला असून ७ जानेवारी २०१८ रोजी कबीर कला मंचच्या चार जणांसह एकूण आठ जणांविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.दडपणासाठी छापेमारीआरएसएस आणि तशी विचारधारा बाळगणारांचे हस्तक बनून पोलीस काम करीत आहेत. खोटे गुन्हे दाखल करून फुले, शाहू, आंबेडकर, पेरियर रामास्वामी, भगतसिंगाच्या विचारधारेवर काम करणाऱ्या चळवळीतील कार्यकर्त्यांना चिरडण्याचे प्रयत्न होत आहे. ज्यांना अटक केली पाहिजे त्या कोरेगाव भीमाच्या दंगलीचे सूत्रधार संभाजी भिडे गुरुजींना सरकार अटक करत नाही. आम्हाला त्रास देण्यासाठी या धाडी मारण्यात येत आहेत, असा आरोप यावेळी अ‍ॅड. गडलिंग तसेच वीरा साथीदार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. पोलिसांनी माझ्या पुतण्याला परीक्षेला (पेपरला) जाण्यासाठी तसेच माझ्या मित्रांना घरात येण्यासाठी अडसर निर्माण केला, असा आरोप अ‍ॅड. गडलिंग यांनी यावेळी केला. या असल्या दडपणाला आम्ही भीक घालणार नाही, असे ते म्हणाले.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावraidधाड