शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

लोकशाहीवरून जनतेचा विश्वास उठावा हाच राहुल गांधींचा अजेंडा

By योगेश पांडे | Updated: November 6, 2025 18:00 IST

देवेंद्र फडणवीस : राहुल यांचा हायड्रोजन बॉम्ब म्हणजे लवंगी फटाका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या व्होटचोरीच्या आरोपांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर मोठा आरोप केला आहे. देशात लोकशाहीत योग्य पद्धतीने नांदू नये यासाठी काही जागतिक तत्व प्रयत्नरत असतात. त्यांचा अजेंडा व राहुल गांधींचे काम एकत्रितपणे सुरू असल्याचे दिसून येत आहे. भारताच्या लोकशाही व त्यातील संस्थांवरून जनतेचा विश्वास उठला पाहिजे असे दोघांकडूनही प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. नागपुरात गुरुवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राहुल गांधी ज्यावेळेस हायड्रोजन बॉम्ब म्हणतात तेव्हा तो लवंगी फटाका असतो हे सर्वांना लक्षात आले आहे. त्यांनी मॉर्फ केलेले फोटो दाखविले असल्याचा काही वाहिन्यांनीच दावा केला आहे. त्यामुळे त्यांच्या दाव्यातील फोलपणा समोर आला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी त्यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मराठवाड्या दौऱ्यावरूनदेखील टीका केली. उद्धव ठाकरे बाहेर पडले याचा मला आनंद आहे. ते मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना संकट आले असताना कार्पेटवरून खाली उतरले नव्हते. सततच्या पराभवानंतर लोकांमध्ये जावे लागते हे त्यांच्या लक्षात आले आहे. अनेक ठिकाणी त्यांच्या दौऱ्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे.

निवडणूका डोळ्यासमोर ठेवून ते आल्याचे शेतकऱ्यांना माहिती आहे. सरकारचे पॅकेज शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचत आहे. त्यामुळे ठाकरे यांना जनतेतून प्रतिसाद मिळत नसल्याचे वास्तव आहे. काही ठिकाणी पॅकेज पोहोचलेले नाही व त्यामुळे तेथील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. मात्र रिझर्व्ह बॅंकेच्या नियमानुसार दररोज ६०० कोटी रुपये आम्हाला द्यावे लागतात. म्हणून पॅकेजला वेळ लागत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पार्थ पवार आरोप प्रकरणाची सखोल चौकशी करणार

पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणासंदर्भात सर्व माहिती मागविली आहे. यासंदर्भातील योग्य चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीच्या आधारावर यासंदर्भात पावले उचलू. प्राथमिकदृष्ट्या जे मुद्दे समोर आले आहेत ते गंभीर आहेत. त्याबाबत पूर्ण माहिती घेऊनच बोलेन. उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील कुठल्याही प्रकाराला पाठीशी घालणार नाही. कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे ही आमची भूमिका आहे. जर अनियमितता असेल तर त्यावर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Rahul Gandhi wants public to distrust democracy: Fadnavis alleges.

Web Summary : CM Fadnavis accuses Rahul Gandhi of working to undermine public trust in Indian democracy. He criticized Gandhi's claims and addressed Uddhav Thackeray's Marathwada tour. Fadnavis also assured a thorough investigation into allegations against Parth Pawar regarding a land scam, promising action if irregularities are found.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRahul Gandhiराहुल गांधीnagpurनागपूरcongressकाँग्रेसBJPभाजपाElectionनिवडणूक 2024Votingमतदान