राहुल गांधींच्या गळ्यात ओबीसीचा शेला घालून केले स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2022 20:45 IST2022-11-18T20:38:14+5:302022-11-18T20:45:39+5:30
Nagpur News राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नागपूरचे पदाधिकारी असलेले काँग्रेस कार्यकर्ते परमेश्वर राऊत यांनी शुक्रवारी शेगाव येथे भारत जोडो यात्रेत ओबीसीचा शेला राहुल गांधी यांच्या गळ्यात टाकून स्वागत केले.

राहुल गांधींच्या गळ्यात ओबीसीचा शेला घालून केले स्वागत
ठळक मुद्दे प्रियंका गांधी यांनी फोटो फेसबुकवर पोस्ट केला
नागपूर : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नागपूरचे पदाधिकारी असलेले काँग्रेस कार्यकर्ते परमेश्वर राऊत यांनी शुक्रवारी शेगाव येथे भारत जोडो यात्रेत ओबीसीचा शेला राहुल गांधी यांच्या गळ्यात टाकून स्वागत केले. विशेष म्हणजे काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी संबंधित फोटो फेसबुकवर पोस्ट करीत भारत जोडण्यासाठी समाजातील प्रत्येक वर्ग रस्त्यावर आला असल्याचे नमूद केले आहे.
पदयात्रेत सहभागी होताना परमेश्वर राऊत यांनी राहुल गांधी यांना ओबीसींच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हावी, अशी मागणीही केली.