शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी द्रष्टे नेते, २०२४ साली ते पंतप्रधान होतील : नाना पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2022 15:22 IST

२०२४ च्या निवडणुकीत काँग्रेस भाजपचा पराभव करेल व राहुल गांधी पंतप्रधान होतील असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

नागपूर : 'राहुल गांधी द्रष्टे नेते आहेत. २०२४ साली ते पंतप्रधान होतील' असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी व्यक्त केला आहे. त्यांनी याबाबतचे ट्विट शेअर केल्यानंतर त्यावरून चर्चा रंगू लागल्या आहेत.  

२०१४ मध्ये नरेंद्र मोदींनी देशातील जनतेला खोटे आश्वासन देऊन स्वप्न दाखवली मात्र ते पूर्ण करण्यात अपयशी ठरले. त्याऐवजी खासगीकरणाचा सपाटा त्यांनी लावला आहे. याच्यामुळे देशात महागाई, बेरोजगारी वाढत चालली आहे. यामुळे जनता त्रस्त झाली आहे. तर, राहुल गांधी यांच्याकडे देशासाठी व्हिजन आहे. २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेस सत्तेवर येईल आणि राहुल गांधी हे पंतप्रधान होतील, असा आशावाद पटोले यांनी व्यक्त केला आहे. 

देशात जीएसटी, लागू केल्यानंतर राहुल गांधींंनी त्याच्या दुष्परिणामाविषयी सांगितले होते. कोरोना महामारीबाबतही त्यांनी सूचित केले होते, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, त्यांची थट्टा करण्याच काम भाजपने केलं. भाजप नेते नेहमी काँग्रेसला दोष देत फिरतात. मोदी संसदेत भाषण देताना नेहमी नेहरूमुळे महागाई वाढल्याचे सांगतात. म्हणजे नेहरू अजूनही मोदीच्या स्वप्नात येतात. काँग्रेसचे सर्वच पंतप्रधानांनी देशाला फक्त दिले आहे, देशाकडून काही घेतलं नाही. याउलट ८ वर्षे बहुमताची सत्ता असतानाही सरकारने देशाला प्रगतीकडे नेण्यापेक्षा देशाला ५० वर्षे मागे नेले असून आपल्या चुकीच्या गोष्टी लपविण्यासाठी गांधी परिवाराला बदनाम करण्याचा अपप्रचार सुरू आहे, असेही पटोले म्हणाले.

काँग्रेस बाप आहेबापच राहणार

राष्ट्रवादी नवरा आहे, शिवसेना बायको आहे आणि काँग्रेस वऱ्हाडीच्या भूमिकेत आहे, अशी प्रतिक्रिया नुकतीच भाजपा खासदार सुजय विखे यांनी केली होती. यावर नाना पटोले यांनी काँग्रेस बाप आहे, बापच राहणार असा प्रतिटोला सुजय विखे पाटील यांना लगावला होता. सुजय विखे नवखे आहेत. त्यांना फार महत्त्व देण्याची गरज नाही असंही नाना पटोलेंनी म्हटलं होतं.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसNana Patoleनाना पटोलेRahul Gandhiराहुल गांधी