कर्जमाफी नव्हे शेतकरी फसवणूक योजना; रघुनाथ पाटील यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 14:37 IST2017-11-23T14:34:04+5:302017-11-23T14:37:54+5:30
कर्ज माफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक सुरु ही कर्जमाफी नव्हे तर शेतकरी फसवणूक योजना आहे, असा आरोप सुकाणू समितीचे सदस्य रघुनाथ पाटील यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केला.

कर्जमाफी नव्हे शेतकरी फसवणूक योजना; रघुनाथ पाटील यांचा आरोप
आॅनलाईन लोकमत
नागपूर : राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली परंतु प्रत्यक्षात कर्ज माफीच्या आकड्यांचा घोळ सुरु आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. परिणामी आत्महत्या थांबलेल्या नाहीत. कर्ज माफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक सुरु ही कर्जमाफी नव्हे तर शेतकरी फसवणूक योजना आहे, असा आरोप सुकाणू समितीचे सदस्य रघुनाथ पाटील यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केला.
रघुनाथ पाटील म्हणाले, आम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी विदर्भात फिरत आहोत. नागपूरनंतर चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ येथील परिस्थिती जाणून घेणार आहोत. सरकारने जाहिर केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेचा बोज
‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनावर कॉंग्रेस, राष्ट्रवादीकॉंग्रेस शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मोर्चा काढणार आहे. पण त्यात शेतकरी सहभागी होतील काय ? असा प्रश्न उपस्थित केला असता कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा शेतकरी मोर्चा म्हणजे ‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’ असाच प्रकार असल्याचा उपरोधिक टोला रघुनाथ पाटील यांनी लगावला. कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी त्यांनी काहीच अंमलात आणल्या नाहीत. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांबाबत बोलण्याचा काडीमात्र अधिकार नसल्याचे त्यांनी सांगितले.