शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

नागपूर जिल्ह्यात आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थ्याचे रॅगिंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 10:12 IST

आदिवासी विभागाच्या उदासा येथील आश्रम शाळेत दुसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यासोबत रॅगिंगचा प्रकार घडला आहे.

ठळक मुद्देदुसरीतील देवांशू मसरामला जबर मारहाण नखाने ओरबडले, पायावर दंड्याने मारलेउदासा येथील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आदिवासी विभागाच्या उदासा येथील आश्रम शाळेत दुसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यासोबत रॅगिंगचा प्रकार घडला आहे. आश्रमशाळेतील मोठ्या मुलांनी जबरदस्त मारहाण केल्यामुळे मुलगा घाबरलेला आहे. शाळेतील इतरही मुलांना रॅगिंगचा फटका बसत असल्याचा आरोप त्याच्या आईने केला आहे. मुलाच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून आश्रमशाळेत यापुढे पाठविणार नसल्याचा निर्णय त्याच्या आईने घेतला आहे.देवांशू कृष्णा मसराम असे मुलाचे नाव आहे. उदासा येथील आश्रमशाळेत ११ जुलैला त्याला दुसऱ्या वर्गात प्रवेश देण्यात आला. दरम्यान आश्रमशाळेतील वरच्या वर्गातील मुलांकडून त्याला जबर मारहाण करण्यात आली. पहाटे ४ वाजता आंघोळ करण्याचा आग्रह त्याला होत होता.वॉशरूममध्ये त्याला मारण्यात आले. त्याच्या पायावर दंड्याने मारल्याचे व्रण आहे. मानेवर नखाचेसुद्धा व्रण दिसत आहे. याच दरम्यान त्याची प्रकृती अस्वस्थ झाली. त्याला रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले. पण याची कुठलीही माहिती त्याच्या आईला देण्यात आली नाही. झालेल्या घटनेची माहिती घरच्यांना होऊ नये म्हणून मुलाला आमिष दाखविण्यात आले, असा आरोप त्याच्या आईने केला आहे.दरम्यान २६ जुलैला त्याच्या आईने फोन करून माहिती घेतली असता, त्याचे अंग दुखत असल्याचे सांगितले. आई लगेच त्याला घरी घेऊन आली. दोन दिवसानंतर त्याने आईला घडलेली घटना सांगितली. त्याच्या आईने मुलाची मानसिक अवस्था बघून त्याला शाळेतून काढण्याचा निर्णय घेतला आहे.

मुलाला मारहाण झाली तरी शिक्षकांकडून काहीही लक्ष दिले गेले नाही. तो तीन दिवस आजारी होता तरी मला सांगण्यात आले नाही. मी जर मुलाला घरी आणले नसते, तर मुलाच्या जीवाला धोका झाला असता. याची तक्रार आदिवासी विभागाकडे मी करणार आहे.- सुचिता मसराम,मुलाची आई

आश्रमशाळेत रॅगिंगचा असा कुठलाही प्रकार घडला नाही. त्याच्या आईने मला तक्रार केली होती. मी लगेच त्याची दखल घेऊन तक्रारीचा निपटारा केला. वरच्या वर्गातील मुलांना नेमके काय झाल्याची विचारणा केली. तेव्हा मुलांनी सांगितले की त्याची शाळेत शिकण्याची मानसिकता नाही. मुलगा आजारी असता तर ग्रामीण रुग्णालयात नोंद घेतली जाते. आई-वडिलांना कळविले जाते. असे काहीच घडलेले नाही.मी देवांशुच्या आईसोबत बोललो आहे. असे काहीच घडलेले नाही.- विनायक पंडे, मुख्याध्यापक,आश्रमशाळा उदासा

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रCrimeगुन्हा