शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या डेंटलमधील रॅगिंग प्रकरण :त्या इंटर्नची इंटर्नशीप थांबवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 23:45 IST

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या (डेंटल) तीन इंटर्न्सकडून दुसऱ्या व तिसऱ्या वर्षांच्या विद्यार्थ्यांचे रॅगिंग झाल्याचे प्रकरण सामोर आल्याने खळबळ उडाली. अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर यांनी या तिन्ही इंटर्न्सची इंटर्न्सशीप थांबविण्याचे आदेश दिले. सोबतच वसतिगृह सोडत असल्याचेही त्यांच्याकडून लिहून घेतले.

ठळक मुद्देवसतिगृह सोडत असल्याचे लिहून घेतले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या (डेंटल) तीन इंटर्न्सकडून दुसऱ्या व तिसऱ्या वर्षांच्या विद्यार्थ्यांचे रॅगिंग झाल्याचे प्रकरण सामोर आल्याने खळबळ उडाली. अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर यांनी या तिन्ही इंटर्न्सची इंटर्न्सशीप थांबविण्याचे आदेश दिले. सोबतच वसतिगृह सोडत असल्याचेही त्यांच्याकडून लिहून घेतले.चार वर्षांचा दंतवैद्यक अभ्यासक्रम अर्थात ‘बीडीएस’ केल्यानंतर त्याच महाविद्यालयात एक वर्षाची इंटर्नशिप करावी लागते. या इंटर्नशिपनंतरच डॉक्टर ही पदवी दिली जाते. शासकीय दंत महाविद्यालयात यावर्षी इंटर्नशिप करणाऱ्या ४० इंटर्न्समधून सहा जणांनी वसतिगृहच सोडले नव्हते. महाविद्यालय प्रशासनाने त्यांना नोटीस बजावल्यानंतर तीन इंटर्न्सनी (आंतरवासी) वसतिगृह सोडले, मात्र तीन इंटर्न्स वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांच्या खोल्या बळकावून राहत होते. महाविद्यालय प्रशासनाने त्यांना वारंवार वसतिगृह सोडण्याची नोटीसही बजावली. परंतु त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नव्हता. याच दरम्यान काही दिवसांपूर्वी अ‍ॅण्टी रॅगिंग समितीचे एक पथक अचानक वसतिगृहात धडकले. यावेळी हे तिन्ही इंटर्न्स विद्यार्थ्यांना रागवत असल्याचे दिसून आले. पथकाने या संदर्भातील आपला अहवाल अधिष्ठात्यांकडे सोपविला. याची गंभीर दखल घेत रॅगिंग होत असल्याचा संशय व्यक्त करीत त्या इंटर्न्सना तातडीने वसतिगृह रिकामे करण्याची पुन्हा नोटीस बजावली. यात वसतिगृह रिकामे न केल्यास इन्टर्नशीप पूर्ण करता येणार नाही, असा इशाराही दिला. शुक्रवारी अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर यांनी या प्रकरणाला घेऊन समिती नेमली. या समितीने त्यांच्या वागणुकीत सुधारणा होईपर्यंत काही दिवसांसाठी त्यांची इंटर्नशीप थांबविण्याचा निर्णय दिला. तसे पत्रही त्या इंटर्न्सला दिले. वसतिगृह सोडत असल्याचेही त्या इंटर्न्सकडून लिहून घेतले. प्राप्त माहितीनुसार, या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल महाविद्यालय प्रशासनाने तयार करून ‘महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक’ला पाठविला जाणार आहे.कारवाईचे अधिकार विद्यापीठालाया संपूर्ण प्रकरणाचा अहवाल लवकरच ‘महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक’ला पाठविण्यात येईल. इंटर्नशीप रद्द करण्याचे अधिकार विद्यापीठाला आहेत. तूर्तास त्यांची इंटर्नशीप पुढील आदेशापर्यंत थांबविण्यात आली आहे.डॉ. सिंधू गणवीरअधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय

 

 

टॅग्स :Studentविद्यार्थीnagpurनागपूर