‘चिंधीबाजार’ प्रथम

By Admin | Updated: July 8, 2014 01:13 IST2014-07-08T01:13:43+5:302014-07-08T01:13:43+5:30

५३ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवाचे पुरस्कार वितरण रविवारी सायंकाळी दिमाखदार सोहळ्यात पार पडले. पुरस्कारांच्या घोषणांसोबत आदिवासींचे सांस्कृतिक कलावैभव सांगणाऱ्या ढोलाच्या

'Ragged market' first | ‘चिंधीबाजार’ प्रथम

‘चिंधीबाजार’ प्रथम

राज्य नाट्य स्पर्धा : १७३ पुरस्कारांची बरसात
चंद्रपूर : ५३ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवाचे पुरस्कार वितरण रविवारी सायंकाळी दिमाखदार सोहळ्यात पार पडले. पुरस्कारांच्या घोषणांसोबत आदिवासींचे सांस्कृतिक कलावैभव सांगणाऱ्या ढोलाच्या थापाबरहुकूम पडणाऱ्या टाळ्यांचा पाऊस आणि ‘हिप हिप हुर्यो’ च्या जल्लोषाने रविवारची सायंकाळ न्हाऊन निघाली होती.
निर्मितीचा प्रथम पुरस्कार मिळवून येथे हा पुरस्कार वितरण सोहळा खेचून आणणाऱ्या चंद्रपुरातील नवोदिता या संस्थेला पुरस्काराची घोषणा झाली, तेव्हा तर अख्खे सभागृहच टाळ्यांच्या गजराने निनादून गेले होते. प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात आयोजित या सोहळ्यास सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे, माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे, जिल्हापरिषद अध्यक्ष संतोष कुंभरे, महापौर संगीता अमृतकर, आमदार नाना शामकुळे, आमदार अतुल देशकर, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर उपस्थित होते.
ना. देवतळे म्हणाले, राज्य नाट्य स्पर्धेच्या आयोजनातून मोठे कलावंत निर्माण झालेत. माराठी रंगभूमीची सेवा करणाऱ्या कलावंतांची दखल राज्य शासन घेत असून मानधनात आणि पुरस्कारांच्या रकमेत २०१२ पासून वाढ केल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई व जिल्हा स्तरीय १९ केंद्रावर एकूण ८ हजार कलावंत एकाच स्पर्धेत रंगमंचिय सादरीकरणासाठी झटत असतात. एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र येवून यशस्वी होणारी ही एकमेवद्वितीत्य स्पधार असावी, अशा शब्दात त्यांनी स्पर्धेचे आणि आयोजनाचे कौतूक केले. चंद्रपूर जिल्ह्यातील झाडीपट्टी कलेचाही त्यांनी भाषणातून गौरव केला.
निर्मितीचे प्रथम पारितोषिक प्राप्त करणाऱ्या चिंधी बाजार (नवोदिता, चंद्रपूर) या नाटकाला पालकमंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक प्रदान करण्यात आले. व्यवसायिक नाट्य स्पर्धेत ठष्ट (अश्विनी आणि अद्वैत थिएटर, मुंबई) या नाटकाला प्रथम पारितोषिक देण्यात आले. हौशी नाटकाच्या दिग्दर्शनाचे दुसरे पारितोषिक चिंधी बाजारच्या दिग्दर्शीका जयश्री कापसे- गावंडे यांना प्रदान करण्यात आले. यावेळी हास्यरंजन सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. उत्कृष्ठ अभिनय, लेखन, प्रकाश योजना, वेशभूशा, संगीत, नेपथ्य व बालनाट्य याप्रकारातील प्रथम, द्वितीय व तृतीय अशी एकूण १७३ पारितोषिके पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आलीत. सोहळ्याचे संचालन नवीन इमानदार व रुपाली मोरे (नागपूर) यांनी केले. सोहळ्याच्या अंतीम चरणात सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहसंचालक मनोज सानप यांनी शहीद कॅप्टन विनायक गोरे यांच्या कार्याचा गौरव करणारे पात्र साकारून समारोपा आणि आभाराला देशपे्रमाचा रंग चढविला. पारितोषिक वितरण समारंभाचे समन्वयक म्हणून सुशिल सहारे यांनी काम पाहिले. राज्यभरातील अनेक ज्येष्ठ रंगकर्मी, लेखक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: 'Ragged market' first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.