रफीच्या आठवणींचा ‘अ लिजेन्ड फॉर लिजेन्ड’
By Admin | Updated: November 10, 2014 01:01 IST2014-11-10T01:01:39+5:302014-11-10T01:01:39+5:30
कर्णमधूर व पहाडी आवाजाचे धनी असणारे हिंदी सिनेमासृष्टीतील दिग्गज गायक म्हणजे मोहमंद रफी. रफी यांनी अभिनेता दिलीप कुमार, देव आनंद व शम्मी कपूर यांच्यासाठी गायलेल्या सुरेल गीतांचा

रफीच्या आठवणींचा ‘अ लिजेन्ड फॉर लिजेन्ड’
कादर यांच्या आवाजातला सुरेल नजराणा
नागपूर : कर्णमधूर व पहाडी आवाजाचे धनी असणारे हिंदी सिनेमासृष्टीतील दिग्गज गायक म्हणजे मोहमंद रफी. रफी यांनी अभिनेता दिलीप कुमार, देव आनंद व शम्मी कपूर यांच्यासाठी गायलेल्या सुरेल गीतांचा कार्यक्र म नागपुरातील प्रसिद्ध गायक एम.ए. कादर यांनी सादर केला. श्रोत्यांनीही त्यांना भरभरून प्रतिसाद दिला. स्थानिक साई सभागृहात क ादर इंटरनॅशनलच्यावतीने ‘अ लीजेन्ड फॉर लीजेन्ड’ हा कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता.
मोहमंद रफी यांनी सिनेमासृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांना आपल्या आवाजाने नवी ओळख दिली. हिंदी सिनेमाचे नाव घेताना ज्या महान कलाकारांचे स्मरण होते अशा कलाकारांत गायक मोहम्मद रफी यांना आदराचे स्थान आहे. करोडो श्रोत्यांच्या गळ्यातील ताईत म्हणून मोहम्मद रफी यांचा उल्लेख करता येतो. रफींचे अनेक दिवाने आहेत. नागपुरातील एम.ए. कादर यांच्या आॅक्रे स्ट्रामध्ये त्यांनी गायिलेले गाणी मोहम्मद रफी साहेबांचीच असतात. याची प्रचिती पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आली. कार्यक्रमाला असलेली गर्दी कादर यांची लोकप्रियता कमी झाली नसल्याचे सांगून गेली.
यावेळी एकापेक्षा एक सरस गीते कादर व त्यांच्या चमूने सादर केली. ‘तारीफ करू क्या उसकी’ हे गीत सादर करीत त्यांनी थेट प्रेक्षकांतून ‘एन्ट्री’ केली. प्रेक्षकांच्या गर्दीतून वाट काढत व त्यांचे अभिवादन स्वीकारत कादर मंचावर आले.
यानंतर कादर यांनी रफी साहेबांनी गायिलेली एकाहून एक सरस गीते सादर केली. ‘मै जिंदगी का साथ निभाता चला गया’, ‘क्या से क्या हो गया’, ‘मधुबन मे राधिका’, ‘ये देश है वीर जवानो का’, ‘आज की रात मेरे’, ‘मुझे दुनिया वालो’ यासारखे एकाहून एक सरस गीते सादर केली. कादर यांच्या व्यतिरिक्त झीनत कादर, भरत मेहता, मोहमंद हुसैन, समृद्धी यांनी देखील गीते सादर केली. संचालन किशन शर्मा यांनी केले. (प्रतिनिधी)