गरिब रूग्णांनाही मिळणार रेडिऑलॉजी सुविधा

By Admin | Updated: August 23, 2014 02:05 IST2014-08-22T23:40:35+5:302014-08-23T02:05:56+5:30

विदर्भातील विविध जिल्हा रुग्णालय व स्त्री रुग्णालयांमध्ये किरणोपयोजन चिकित्सा केंद्र विकसित करण्यात येत आहे.

Radiology facility to get poor patients | गरिब रूग्णांनाही मिळणार रेडिऑलॉजी सुविधा

गरिब रूग्णांनाही मिळणार रेडिऑलॉजी सुविधा


नीलेश शहाकार / बुलडाणा
ग्रामीण व शहरी भागातील अनेक रुग्ण असाध्य आजाराने पिडीत असतात. त्या रुग्णांच्या आजाराचे वेळीच निदान होत नाही. खासगी रुग्णालयामधील उपचार त्यांच्या आवाक्याबाहेर असतात. यामुळे त्यांना आर्थिक व मानसिक तणावात जीवन व्यतित करावे लागते. त्यापृष्ठभूमिवर अल्पदरात आरोग्य चिकित्सा सेवा देण्यासाठी विदर्भातील विविध जिल्हा रुग्णालय व स्त्री रुग्णालयांमध्ये किरणोपयोजन चिकित्सा केंद्र विकसित करण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे भागीदारी तत्त्वावर उच्च गुणवत्तेची व गरिबांना परवडण्याजोगी चिकित्सा सेवा देण्यासाठी ३५ जिल्हा रुग्णालय व स्त्री रुग्णालयांची निवड करण्यात आली आहे. यात २४ जिल्हा सामान्य रुग्णालय, ६ महिला रुग्णालय, ४ सामान्य रुग्णालय तसेच १ केंद्रीय रुग्णालयाचा समावेश आहे. या किरणोपयोजन केंद्रातून क्ष-किरण, युएसजी, मॅमोग्राफी, सिटीस्कॅन, एमआरआय या सुविधा अल्पदरात पुरविल्या जाणार आहे. खाजगी रुग्णालय किंवा रेडिओलॉजी लॅबोरेटरीतून उपचारासाठी मोठा खर्च आकारला जातो. त्यामुळे सरकारी रुग्णालयात उपचार घेण्याशिवाय गरिबांना पर्याय राहत नाही. सरकारी जिल्हा रुग्णालये ही ग्रामीण आणि शहरी भागातल्या गोरगरीबांची जीवनदायीनीच असतात. ही रुग्णालये सुसज्ज व्हायलाच हवीत. म्हणून सरकारी रुग्णालयात, त्या परिसरात किंवा रुग्णालयाच्या जवळपासच्या जागेत ही चिकित्सा केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. या केंद्रांवर विशेष प्रशिक्षित तांत्रिक कर्मचारी वर्गाकडून रुग्णांना सेवा पुरविल्या जाणार आहेत.

 

Web Title: Radiology facility to get poor patients