शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
4
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
5
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
6
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
7
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
8
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
9
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
10
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
11
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
12
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
13
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
14
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
15
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
17
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
18
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
19
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे

मुसळधार ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2016 02:14 IST

मागील आठवडाभरापासून पावसाने जिल्ह्यात जोर पकडला आहे. या पावसाने सध्या सर्व नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.

नदी-नाले तुडुंब भरले : कोंढाळी-काटोल मार्गावरील वाहतूक ठप्पनागपूर : मागील आठवडाभरापासून पावसाने जिल्ह्यात जोर पकडला आहे. या पावसाने सध्या सर्व नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. शिवाय लहान-मोठे जलाशयसुद्धा तुडुंब भरले आहे. उपराजधानीत रोज सुरू असलेल्या या पावसाने जनजीवन प्रभावित झाले आहे.सोमवारी दिवसभर ऊन तापले. परंतु सायंकाळ होताच ६ वाजताच्या सुमारास चांगलाच धो-धो पाऊस कोसळला. या काहीच मिनिटाच्या पावसाने शहरातील सर्व रस्ते जलमय झाले होते. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. शिवाय सखल भागातील अनेक वस्त्यांमध्ये पाणीसुद्धा शिरले. खामला चौकातील नेल्को सोसायटीमध्ये पाणी भरल्याने येथे तलावासारखे चित्र निर्माण झाले होते. नागरिकांना या पावसाचा चांगलाच फटका सहन करावा लागला. सोबतच जिल्ह्यात दुपारपासूनच धुवाँधार पावसाला सुरुवात झाली होती. या मुसळधार पावसामुळे कोंढाळी-काटोल मार्गावरील नाल्याला पूर आल्याने या मार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली होती. दरम्यान जिल्ह्यातील काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्वरसह सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. यामुळे काटोल तालुक्यातील जाम नदी दुथडी भरून वाहात होती. यामुळे अरविंद इंडो पब्लिक स्कूलचे विद्यार्थी व इतर नागरिक सुमारे तासभर अडकून पडले होते. तसेच कोंढाळीतील प्राथमिक आरोग्य केंद्र मार्गावरील नाल्याचे पाणी थेट वडारपुरा भागातील काही घरात शिरले होते. सोमवारी दिवसभरात नागपूर शहर व ग्रामीणमध्ये एकूण ४.९० मिमी पावसाची नोंद झाली असून, काटोल तालुक्यात १५ मिमी, नरखेड २१ मिमी, सावनेर १४ मिमी व कळमेश्वर ३० मिमी पाऊस पडला आहे. (प्रतिनिधी)