बिस्किट कंपनीत कामगारांचा राडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:08 IST2021-06-02T04:08:30+5:302021-06-02T04:08:30+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क काेराडी : नांदा-काेराडी परिसरातील साक्षी बिस्किट कंपनीतील कामगारांनी विविध रास्त मागण्यांकडे कंपनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राडा ...

बिस्किट कंपनीत कामगारांचा राडा
लाेकमत न्यूज नेटवर्क
काेराडी : नांदा-काेराडी परिसरातील साक्षी बिस्किट कंपनीतील कामगारांनी विविध रास्त मागण्यांकडे कंपनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राडा घातला. कामगारांवर हाेत असलेल्या अन्यायाविराेधात महादुलाचे नगराध्यक्ष राजेश रंगारी यांच्या नेतृत्वात कामगारांनी मंगळवारी (दि.१) कामबंद आंदाेलन केले.
काेराेना संकटकाळात कंपनीतील कामगार संघपाल काेलते यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जागी त्यांच्या पत्नीला कामावर घेण्यात यावे. कामगारांकडून १२ ऐवजी आठ तास काम करण्यात यावे, वार्षिक पी.एल. सुट्या मिळाव्यात, कामगारांना परिमंडळ १ चे वेतन देण्यात यावे, आदी मागण्यांसह मृत पावलेल्या कामगारांच्या पत्नीला कामावर घ्यावे, अशी आग्रही मागणी राजेश रंगारी यांनी केली. याबाबत १५ जूनपर्यंत अल्टीमेटम देण्यात आला. तसेच या कंपनीत खासगी कंत्राटदाराकडून कामगार नियुक्त केले जातात. अशावेळी कंत्राटदार कामगारांवर अन्याय करताे, धमकावताे. याबाबत कंपनीने तत्काळ दखल घ्यावी. अन्यथा कंपनीचे काम बंद पाडण्याचा इशाराही रंगारी यांनी दिला. यावेळी काेराडीचे सरपंच नरेंद्र धानाेरे, उपसरपंच आशिष राऊत, लाेणखैरीचे सरपंच लीलाधर भोयर, उपसरपंच बोधिसत्व झोडापे यांच्यासह भारतीय जनता कामगार महासंघाचे प्रीतम लोहासारवा, राहुल नागदेवे, विश्वनाथ चव्हाण, प्रतीक रंगारी, आकाश रॉय, बुलेश डहाके, राेहित सोनवणे, राहुल इंगोले, नितीन मनवर, संतोष खाेब्रागडे व कामगार उपस्थित हाेते.