शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

शाळा बंद असल्याने आरटीई प्रवेश प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:07 IST

नागपूर : शिक्षण संचालनालय पुणे यांनी १५ एप्रिल रोजी राज्यातील शाळेत २५ टक्के आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू करून पालकांची ...

नागपूर : शिक्षण संचालनालय पुणे यांनी १५ एप्रिल रोजी राज्यातील शाळेत २५ टक्के आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू करून पालकांची प्रवेश यादी जाहीर केली; परंतु सध्या शाळा बंद ठेवण्यात याव्यात, असा शासनाचाच आदेश असल्याने सदर प्रवेश प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी, अशी मागणी होत आहे.

आरटीई अधिनियम २००९ अंतर्गत २५ टक्के वंचित व दुर्बल घटकातील बालकांना वर्ग १ ते ८ मध्ये राज्यातील शाळा मोफत शिक्षण अंदाजे ४ लाख विद्यार्थ्यांना देत आहेत; परंतु शासनाने अद्यापही २०१७-१८ पासून २०२०-२१ चा आरटीई परतावा शाळांना नियमाप्रमाणे दिलेला नाही, त्यामुळे शाळा संचालक फारच आर्थिक अडचणीत आले व त्याचा परिणाम शालेय खर्च व वेतनावर झाला आहे.

आरटीई परतावा शाळांना मिळण्याकरिता आमरण उपोषण करण्यात आले. त्यावेळी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सात दिवसांत वित्त मंत्रालयात सदर निधी मंजूर करून शाळांना देऊ, असे शासनाचे लिखित पत्र दिले. राज्याची १६५० कोटींची मागणी असताना फक्त ५० कोटी मंजूर करून शाळांना न्याय देऊ शकले नाही.

संपूर्ण रक्कम जोपर्यंत शासन शाळांना देत नाही किंवा नियोजन करीत नाही, तोपर्यंत प्रवेश प्रक्रिया स्थगित करावी, अशी मागणी आरटीई फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. सचिन काळबांडे यांनी शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे.