शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

नागपूर विभागातील पावणेतीन लाख शेतकरी होणार कर्जमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 22:45 IST

राज्यातील महाविकास आघाडीने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. नागपूर विभागातील तब्बल पावणेतीन लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल, असा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचा प्राथमिक अंदाज : प्रत्यक्ष लाभासाठी उजळणार एप्रिल महिना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील महाविकास आघाडीने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. नागपूर विभागातील तब्बल पावणेतीन लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल, असा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे. परंतु या योजनेचा प्रत्यक्ष लाभ एप्रिल महिन्यापासून मिळणार असल्याचे संकेत आहेत.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. त्यांनी ३० जून २०१६ पर्र्यंतच्या थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ दिला. या योजनेनुसार दीड लाखापर्यंतचे पीक कर्ज माफ होणार असून, त्यावरील रक्कम एकमुस्त भरल्यास दीड लाखांचा लाभ मिळणार होता. या योजनेचा राज्यातील ८० लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून, ३० हजार कोटींच्यावर रक्कम मिळणार असल्याचा दावा त्यावेळी करण्यात आला होता. जून २०१७ ला याचा आदेश काढला. गेल्या अडीच वर्षात ५० लाख शेतकऱ्यांनाही लाभ मिळाला नसल्याचे सांगण्यात येते. यामध्ये नागपूर जिल्ह्यात सव्वा लाख शेतकरी पात्र ठरणार असल्याचे सांगण्यात येत होते. आजवर ५२ हजारच्या घरातच शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत दोन लाखापर्यंतच्या कर्ज थकलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. या योजनेवर टीका झाल्यानंतर दोन लाखावरील व नियमित कर्ज फेडणाऱ्यांनाही मदत करण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. शासन आदेशानंतर प्रशासनाकडून पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्यात येत आहे. प्राथमिक अंदाजानुसार नागपूर विभागात २ लाख ७८ हजार ७४६ शेतकऱ्यांना लाभ मिळेल. सर्वाधिक ७५ हजार ३३६ शेतकरी वर्धा जिल्ह्यातील आहेत. त्यापाठोपाठ चंद्रपूर जिल्ह्यातील ६० हजार ८७० शेतकरी पात्र ठरतील. सर्वात कमी गडचिरोली जिल्ह्यातील १७ हजार ९३ शेतकरीच पात्र ठरतील. फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधीची तरतूद करण्यात येणार असून, एप्रिल महिन्यापासून प्रत्यक्ष लाभ मिळणार असल्याचे सांगितले जाते. परंतु प्रत्यक्षात किती जणांना याचा लाभ मिळतो, हे येणारी वेळच सांगेल.जिल्हा                      राष्ट्रीयकृत बँक               जिल्हा मध्यवर्ती बँकनागपूर                    ४९,४८९                       ४६२१भंडारा                    १०,९८९                        २८,९७४चंद्रपूर                     २३,२१६                       ३७,६५४गोंदिया                    ११,०४१                        २०,३३३गडचिरोली               १२,२२१                       ४८७२वर्धा                         ७५,३३६                      ०० 

टॅग्स :FarmerशेतकरीVidarbhaविदर्भ