शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

चांगल्या गोष्टी निर्माण करणे हाच कलेचा हेतू : प्रेमानंद गज्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 00:58 IST

उद्यापासून नागपूर येथे आयोजित ९९व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष, मराठी कवी, लेखक व नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी ‘लोकमत’शी साधलेला संवाद. ‘कविता, कादंबऱ्या, नाटकं, नृत्य कोणती पण कला असो, त्या कलेसोबत व्यक्तिस्वातंत्र्य हे जोडलेलेच असते. व्यक्तिस्वातंत्र्य, म्हणजे नुसते शासनाविरु द्ध बोलणे असे नसून, सामान्य गोष्टीत सुद्धा ते आढळते. माझे स्वातंत्र्य अबाधित असले पाहिजे हे कुठल्याही व्यक्तीला वाटेल, त्यात चूक काहीच नाही. व्यक्तिस्वातंत्र्य छोट्याछोट्या गोष्टींमध्ये असते. माणसांनी विवेकाने वागणे हे सुद्धा स्वातंत्र्यच, असे मनोगत प्रेमानंद गज्वी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे लोकमतशी साधला संवाद

अंकिता देशकर/लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उद्यापासून नागपूर येथे आयोजित ९९व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष, मराठी कवी, लेखक व नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी ‘लोकमत’शी साधलेला संवाद. ‘कविता, कादंबऱ्या, नाटकं, नृत्य कोणती पण कला असो, त्या कलेसोबत व्यक्तिस्वातंत्र्य हे जोडलेलेच असते. व्यक्तिस्वातंत्र्य, म्हणजे नुसते शासनाविरु द्ध बोलणे असे नसून, सामान्य गोष्टीत सुद्धा ते आढळते. माझे स्वातंत्र्य अबाधित असले पाहिजे हे कुठल्याही व्यक्तीला वाटेल, त्यात चूक काहीच नाही. व्यक्तिस्वातंत्र्य छोट्याछोट्या गोष्टींमध्ये असते. माणसांनी विवेकाने वागणे हे सुद्धा स्वातंत्र्यच, असे मनोगत प्रेमानंद गज्वी यांनी व्यक्त केले.या वर्षीच्या नाट्य संमेलनात तुम्हाला काय वेगळे दिसतंय, याबद्दल गज्वी म्हणाले, या संमेलनात बरेचसे वेगळ्या धाटणीची नाटकं दिसत आहेत. त्यातील एक म्हणजे श्याम पेठकर लिखित आणि हरीश इथापे दिग्दर्शित 'तेरवं', ज्यात विधवा स्त्रियांचे प्रश्न मांडण्यात आले आहेत. नागपूरचे प्रेक्षक कसा प्रतिसाद देतील असे विचारले असता, गज्वी म्हणाले, संमेलनाचे स्वरूप हे मनोरंजक आहे, यात तमाशा, परिसंवाद, नाटकं या सगळ्यांचा समावेश आहे. सगळ्यांना आपण एकाच वेळी खूश करू शकत नाही हे मात्र खरंय. या चार दिवसीय संमेलनानंतर आपण ‘अ‍ॅनालिसिस’ करू शकतो की या संमेलनाने आपल्याला काय दिले?‘पूर्वी गावाकडे आम्ही अनेक नाटकं करायचो, आज त्यांना झाडीपट्टी असे लोक म्हणतात. उमाजी नाईक, गड आला पण सिंह गेला या नाटकांना आता झाडीपट्टीचे नाटक म्हणता येणार नाही. आमच्यासारख्या कलावंतांनी खेड्यातून येऊन मुंबईत आपले स्थान निर्माण करणे हीच मोठी गोष्ट आहे. विदर्भाच्या रंगभूमीबद्दल आता जर विचार केलात तर असे लक्षात येते की नागपूरमध्ये रंगभूमी उभी नाही. कारण एकदा राज्य नाट्य स्पर्धा झाली की कुणी काहीच करत नाही. वर्षभर नाटकं सादर केली जात नाहीत. जागतिकीकरणामुळे सगळे बदलतेय. त्यामुळे असे म्हणणे बरोबर नाही की थिएटर नागपुरात राहिलेले नाही. पण त्याचे स्वरूप नक्कीच बदलले आहे.आज व्यावसायिक नाटकं करायची म्हटली तर किमान ८-१० लाखाचा खर्च येतो. त्यात पण काही नट असले तरच नाटकांना गर्दी होते. हवा तसा व्यवसाय नाटकं करीत नाहीत. प्रत्येक नाटक चालेलच याची शाश्वती नाही.नाट्य संमेलनाकडून कलावंतांना काय शिकायला मिळेल याविषयी गज्वी म्हणतात, ‘कला तुमच्यासमोर जेव्हा सादर होते तेव्हा त्यातील काय चांगले हे तुम्हीच ठरवायचे आणि ते घेऊन आचरणात आणायचे. ‘एकच प्याला ’ सादर झाला आणि सगळ्यांना कळले दारूमुळे संसाराची माती होते. पण तरी आज आपण जे दृश्य बघतो ते वेगळेच आहे. कलेमधून काय घ्यावे हे व्यक्ती निगडित आहे. असं म्हणतात की६४ कला आहेत. पण सगळ्याच चांगल्या आहेत, असे आपल्याला म्हणता येणार नाही.

टॅग्स :marathiमराठीNatakनाटक