हिरव्या नारळाच्या कवटीतून उगविले जांभळाचे राेपटे ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:07 IST2021-06-18T04:07:07+5:302021-06-18T04:07:07+5:30
नागपूर : हिरव्या नारळातील पाणी पिल्यानंतर उरलेली कवटी दुकानदाराला परत करताे किंवा फेकून देताे. असे हिरवे नारळ घरी आणल्यानंतर ...

हिरव्या नारळाच्या कवटीतून उगविले जांभळाचे राेपटे ()
नागपूर : हिरव्या नारळातील पाणी पिल्यानंतर उरलेली कवटी दुकानदाराला परत करताे किंवा फेकून देताे. असे हिरवे नारळ घरी आणल्यानंतर तर ते हमखास फेकण्यात जाते. मात्र चिमुकल्या शाळकरी मुलीने या कवटीत राेपटे लागवडीची नवीन कल्पना सुचविली आहे. तिने त्यात जांभळाचे बी लावून राेप वाढविले आहे.
पावसाळा सुरू झाला की नागरिकांमध्ये वृक्षलागवडीची हुरहूर निर्माण हाेते. नर्सरीमधून राेप आणून घराची परसबाग फुलविली जाते. फ्लॅटमध्येही फुलझाडे सजविली जातात. या वैयक्तिक गाेष्टीला सार्वजनिक रूप देण्याचे प्रयत्न शहरातील ग्राेव्हील फाऊंडेशनने गेल्या वर्षीपासून सुरू केले आहे. गेल्या वर्षी यात प्राैढांचा सहभाग हाेता पण यावेळी शाळकरी मुलांना जाेडण्यात आल्याने नवीन संकल्पनांसह ‘सेल्फी विथ सॅपलिंग’ ही माेहीमच सुरू झाली आहे. याअंतर्गत हडस हायस्कूल व साेमलवार माॅ उमिया ब्रॅंचच्या २००० च्यावर मुलांनी राेपटे लागवड सुरू केली. या मुलांनी त्यांच्यातील नवनवीन कल्पनांनी बियांचे जतन करून राेपे तयार केली. हडस हायस्कूलच्या विद्यार्थिनीचे नारळाच्या कवटीतील राेप त्याच कल्पनेतून साकार झाले.
ग्राेव्हीलचे डाॅ. अभिक घाेष यांनी सांगितले, आंबे, कडूलिंब व जांभळाच्या निसर्गस्नेही राेपांना प्राधान्य देण्यात आले असून अशाप्रकारे प्रत्येक मुलांकडून ५ ते १० राेपांची निर्मिती करून ५००० वर राेपटे तयार केले आहेत. या राेपट्यांचे लाेकांच्या घरी आणि काही एनजीओंच्या मदतीने सार्वजनिक जागेवर वृक्षाराेपण करण्यात येणार असल्याचे डाॅ. घाेष यांनी स्पष्ट केले. मुलांच्या सहभागाने या माेहिमेला वेगळे रूप आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
वेस्टमधून ट्री-गार्ड
काही मुलांनी घरातील धातूच्या कचऱ्यापासून ट्री-गार्ड तयार करण्याची कल्पना अमलात आणली.
मियावाॅकी वृक्षाराेपण
वेगाने जंगल निर्माण करण्याची ही जपानी टेक्निक आहे. मुलांनी या पद्धतीनेही राेपटे तयार केले व जवळच्या उद्यानात, मैदानात त्यांची लागवड करण्याची संकल्पना मांडली. फाऊंडेशनद्वारे जागांची निवड करून ती संकल्पना अमलात आणली जाईल.