नागपूरमार्गे पुरी-जोधपूर-पुरी विशेष रेल्वेगाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:12 IST2021-01-16T04:12:21+5:302021-01-16T04:12:21+5:30
नागपूर : रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे प्रशासनाने पुरी-जोधपूर-पुरी विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला असून ही गाडी नागपूरमार्गे धावणार आहे. ...

नागपूरमार्गे पुरी-जोधपूर-पुरी विशेष रेल्वेगाडी
नागपूर : रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे प्रशासनाने पुरी-जोधपूर-पुरी विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला असून ही गाडी नागपूरमार्गे धावणार आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०२०९३ पुरी-जोधपूर विशेष रेल्वेगाडी पुरीवरून बुधवारी २० जानेवारीपासून दुपारी ४.०५ वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ८.४०, भंडारा ९.२८, नागपूरला १०.५५ आणि जोधपूरला तिसऱ्या दिवशी सकाळी ११.५५ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात रेल्वेगाडी क्रमांक ०२०९४ जोधपूर-पुरी विशेष रेल्वेगाडी शनिवारी २३ जानेवारीपासून जोधपूरवरून दुपारी २.१५ वाजता सुटेल. ही गाडी नागपूरला दुसऱ्या दिवशी दुपारी २.४० वाजता, भंडारा ३.३९ वाजता, गोंदिया ४.३८ वाजता आणि पुरी येथे तिसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता पोहोचेल. दोन्ही गाड्यांना एकूण २३ कोच आहेत. यात १ एसी टु टायर, १ एसी फर्स्ट, ५ एसी थ्री टायर, ९ स्लिपर, ४ सामान्य, १ पेंट्रीकार आणि २ एसएलआर कोच राहतील. प्रवाशांनी या विशेष रेल्वेगाडीचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
...........