सावनेर शहरात दंडात्मक कारवाईला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:07 IST2021-04-17T04:07:57+5:302021-04-17T04:07:57+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : शहरासह तालुक्यात काेराेना संक्रमण व काेराेनामुळे मृत्यूचा दर वाढत आहे. मात्र, नागपूर काेराेना प्रतिबंधक ...

सावनेर शहरात दंडात्मक कारवाईला सुरुवात
लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : शहरासह तालुक्यात काेराेना संक्रमण व काेराेनामुळे मृत्यूचा दर वाढत आहे. मात्र, नागपूर काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांची पायमल्ली करीत असल्याने शेवटी पाेलीस प्रशासनाने दंडात्मक कारवाई करायला सुरुवात केली. पाेलिसांनी पहिल्या दिवशी (शुक्रवार, दि. १६) १४१ जणांवर कारवाई करीत त्यांच्याकडून एकूण १३ हजार ५०० रुपयाचा दंड वसूल केला.
सावनेर शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात काेराेना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ हाेत आहे. हे संक्रमण राेखण्यासाठी स्थानिक नगर परिषद व पाेलीस प्रशासनाने राेज जनजागृती करीत नागरिकांना काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे काटेकाेर पालन करण्याचे विनंतीवजा आवाहन केले, परंतु नागरिकांना काही जाग आली नाही. शहरासह तालुक्यातील काेराेना संक्रमण हाताबाहेर जाऊ नये तसेच सध्याचेे संक्रमण नियंत्रणात आणण्यासाठी शेवटी पाेलीस व नगर परिषद प्रशासनाने संयुक्तरीत्या दंडात्मक कारवाई करायला सुरुवात केली.
या पथकाने शुक्रवारी शहरातील विविध भागात फिरणाऱ्या नागरिक, वाहनचालक व दुकानदारांची तपासणी करीत मास्क न वापरता फिरणाऱ्या १३३ नागरिक तसेच मास्क न वापरणे व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या आठ दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करीत त्यांच्याकडून एकूण १३ हजार ५०० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. ही माेहीम यापुढेही सुरू राहणार आहे. नागरिकांनी काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे पालन न केल्यास तसेच विनाकारण घराबाहेर फिरल्यास कुणाचीही गय न करता दंडात्मक व प्रसंगी कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती ठाणेदार मारुती मुळूक यांनी दिली. या पथकात पाेलीस विभागासह नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश हाेता.