मास्क न वापारणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:07 IST2020-11-28T04:07:54+5:302020-11-28T04:07:54+5:30
रेवराल : दुसऱ्या फेरीतील काेराेना संक्रमण नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांना घराबाहेर पडण्यापूर्वी मास्क वापरणे अनिवार्य केले आहे. जे नागरिक वारंवार ...

मास्क न वापारणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
रेवराल : दुसऱ्या फेरीतील काेराेना संक्रमण नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांना घराबाहेर पडण्यापूर्वी मास्क वापरणे अनिवार्य केले आहे. जे नागरिक वारंवार सूचना देऊनही मास्कचा वापर करीत नाही, त्यांच्यावर प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड ठाेठावावा, असे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी तहसील कार्यालयाला दिले आहेत, अशी माहिती माैद्याचे तहसीलदार प्रशांत सांगळे यांनी दिली.
माैदा शहरासह तालुक्यात काेराेनाचे संक्रमण कायम आहे. मात्र, शहरातील नागरिक मास्क न वापरता घराबाहेर पडत असल्याने तसेच ही बाब काेराेनाच्या पथ्यावर पडणारी असल्याने जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या आदेशान्वये माैदा शहरात बुधवार (दि. २५)पासून तहसीलदार प्रशांत सांगळे यांच्या नेतृत्वात विशेष माेहीम राबवायला सुरुवात करण्यात आली. यात खंडविकास अधिकारी दयाराम राठाेड यांच्यासह महसूल, पाेलीस व पंचायत विभागातील कर्मचारी सहभागी झाले हाेते. परंतु, स्थानिक नगर पंचायतच्या मुख्याधिकारी काेमल कराळे या अनुपस्थित हाेत्या. दरम्यान, या पथकाने शहरातील बाजारासह राेडवरून जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांची तपासणी करीत मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. ही माेहीम यापुढेही सुरू राहणार असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत सांगळे यांनी दिली.
...
या माेहिमेत नगर पंचायतच्या मुख्याधिकारी काेमल कराळे यांनी सहभागी हाेणे आवश्यक हाेते. त्या दाेन दिवस सहभागी न झाल्याने त्यांना कारण दाखवा नाेटीस बजावून त्यांचे म्हणणे जाणून घेतले जाईल.
वंदना सवरंगपते,
उपविभागीय अधिकारी, माैदा.