पुण्यातल्या गुंतवणुकीची कवाडे खुली

By Admin | Updated: June 26, 2014 00:49 IST2014-06-26T00:49:36+5:302014-06-26T00:49:36+5:30

पुण्यामध्ये रोजगाराकरीता येणाऱ्या इतर शहरातील नागरिकांची संख्या वाढत आहेत. पुण्यामध्ये गुंतवणूक करण्याकरीता अनेकजण पुढे येऊ लागले आहेत. कोलते-पाटील डेव्हलपर्सने

Pune's investment plans open | पुण्यातल्या गुंतवणुकीची कवाडे खुली

पुण्यातल्या गुंतवणुकीची कवाडे खुली

कोलते-पाटील डेव्हलपर्स : स्वप्नातील घर ‘थ्री ज्वेल्स’मध्ये
नागपूर : पुण्यामध्ये रोजगाराकरीता येणाऱ्या इतर शहरातील नागरिकांची संख्या वाढत आहेत. पुण्यामध्ये गुंतवणूक करण्याकरीता अनेकजण पुढे येऊ लागले आहेत. कोलते-पाटील डेव्हलपर्सने कात्रज-कोंढवा रस्त्यावर ‘थ्री ज्वेल्स’ हा नवा गृहप्रकल्प दाखल केल्याची माहिती कोलते-पाटील डेव्हलपर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांनी दिली.
सातारा, कोल्हापूर, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, अमरावती, नागपूर या शहरांमध्ये डेव्हलपर्सचे प्रतिनिधी ग्राहकांशी प्रत्यक्ष संवाद साधत आहेत. ‘क्रिएशन : नॉट कन्ट्रक्शन’ असे ब्रीदवाक्य असलेल्या कोलते-पाटील डेव्हलपर्सचे उद्दिष्ट फक्त सदनिकांची विक्री करणे नसून गुंतवणुकीसाठी शिक्षित करणे हादेखील आहे. पुण्यामध्ये सुमारे १ कोटी चौरस फूटांपेक्षा जास्त जागेत प्रोजेक्टची निर्मिती केली आहे. फक्त निवासी प्रकल्पामध्येच नाही, तर कमर्शियल प्रकल्प आणि आयटी पार्क व टाऊनशिप्सची निर्मिती केली आहे. हिंजवडी, पिंपळे निलख, बावधन, खराडी, वाघोली, वानवडी, एनआयबीएम या भागात मोठे प्रकल्प आहेत. तर पुण्याबाहेर मुंबईमध्ये चार प्रकल्प आणि बंगळुरु येथे अनेक प्रकल्प सुरु आहेत. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील ‘थ्री ज्वेल्स’ प्रकल्पाचा फायदा पुणे-मुंबई सोडून इतर शहरांतील नागरिकांच्या आधी इतर शहरांतील नागरिकांना व्हावा, याकरीता विशेष प्रयत्न केले आहेत. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत कात्रज-कोंढवा रस्त्यावरील सगळ्यात मोठा कम्युनिटी प्रकल्प ठरणार आहे. सामान्य मध्यवर्गीयापासून ते उच्चवर्गीयापर्यंत सगळ्यांकरीता १, २ आणि ३ बेडरुमच्या सदनिका उपलब्ध करुन दिल्या आहेत. सुमारे ३५ एकर जागेत विस्तारलेल्या या प्रकल्पात १८ टॉवर्स असून ५० टक्क्यापेक्षा अधिक जागा मोकळी सोडण्यात आली आहे.
स्वप्नातील घर पुण्यामध्ये घेण्याची संधी उपलब्ध होत आहे. प्रकल्पाजवळ रुग्णालये, शाळा, क्लब, शॉपिंग मॉल, रेस्टॉरंट असल्याने अधिक सोय होणार आहे. उच्च दर्जा, डिझाईनमधील वेगळेपणा आणि पारदर्शकता यामुळे प्रकल्पाला वेगळे स्थान मिळणार आहे. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील इस्कॉन मंदिराशेजारी हा प्रकल्प आहे. प्रकल्पात जीम, टेनिस कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट, साहसी क्रीडाप्रकार, क्लायबिंग वॉल, जैन मंदिर यांसह नानाविध सुविधा देण्यात येणार आहेत. तसेच प्ले ग्रुपकरीता शाळा सुरु करण्यात येणार आहे.
हिंजवडीमधील ४०० एकर आणि वाघोली ८५ एकरमध्ये साकारलेल्या मोठया प्रकल्पांनंतर हा सर्वात मोठा प्रकल्प ठरणार आहे. यापूर्वी कोलते-पाटील डेव्हलपर्सचे ४८ प्रकल्प पूर्ण झाले आहेत. १२ प्रकल्प सुरु असून नव्या १० प्रकल्पांचे नियोजन सुरु आहे. ‘थ्री ज्वेल्स’ हा प्रकल्प सर्व प्रमुख ठिकाणांशी जोडला गेला आहे. मुंबई-पुणे बायपास रस्ता (एनएच४) आणि पुणे-सोलापूर हायवे (एनएच९) प्रकल्पापासून अगदी जवळ आहेत. तसेच व्हिआयटी कॉलेज, भारती विद्यापीठसारख्या शैक्षणिक संस्था, एम.जी.रोड, स्वारगेट, पुणे स्टेशन, मार्केटयार्ड या महत्वाच्या ठिकाणांशीही जोडला गेला आहे. शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागाचा विस्तार पाहता हा प्रकल्प ग्राहकांकरीता फायदेशीर ठरणार आहे. कात्रज-कोंढवा भागात पायाभूत सुविधा असल्याने ‘थ्री ज्वेल्स’मधील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कोलते-पाटील यांनी ग्राहकांनी दिलेली ही संधी पर्वणी ठरणार असून स्वप्नातील घर साकार करता येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Pune's investment plans open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.