शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
2
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
3
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
4
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
5
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
6
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
7
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
8
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
9
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
10
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
11
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
12
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
13
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
14
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
15
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
18
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
20
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका

आयसोलेट असणाऱ्यांना दिले ‘पल्स ऑक्सिमीटर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 8:49 PM

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. अपुऱ्या वैद्यकीय व्यवस्थेमुळे रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवण्यात येत आहे. या रुग्णांना घरीच पल्स ऑक्सिमीटर पुरविण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत जिल्ह्यातील १८२० रुग्णांना ऑक्सिमीटरचा पुरवठा करण्यात आला आहे.

ठळक मुद्देनागपूर जिल्हा प्रशासनाचा पुढाकार : १८२० रुग्णांना वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. अपुऱ्या वैद्यकीय व्यवस्थेमुळे रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवण्यात येत आहे. या रुग्णांना घरीच पल्स ऑक्सिमीटर पुरविण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत जिल्ह्यातील १८२० रुग्णांना ऑक्सिमीटरचा पुरवठा करण्यात आला आहे.२० सप्टेंबरपर्यंत ग्रामीण भागामध्ये १२ हजार ७४३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ९,२५८ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मातही केली आहे. तर सद्यस्थितीत ३,१२६ वर रुग्ण हे अ‍ॅक्टिव्ह आहेत. यापैकी बहुतांश रुग्णांना लक्षणे नसल्याने ते गृह विलगीकरणात उपचारार्थ आहेत. तर काही रुग्ण कोविड केअर सेंटर (सीसीसी) मध्ये तर काही रुग्णालयांमध्ये डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेत आहे. सध्या जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील कोरोना संकट आता थोडे ओसरले असले तरी, नागपूर ग्रामीण, हिंगणा या तालुक्यात हे कोरोनाचे संकट अद्यापही कायमच आहे. यावर प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. वाढती रुग्णसंख्या व त्यातच अनेकांना लक्षणे नसतानाही त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याने अशांना आता गृह विलगीकरणातच ठेवण्यात येत आहे. त्यामुळे अशा रुग्णांनाच पल्स ऑक्सिमीटर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने ऑक्सिमीटर विकत घेतले आणि ग्रामीण भागातील रुग्णांना दिले जात आहेत. याद्वारे त्यांच्या प्रकृतीच्या अंदाज घेणे सोपे होत आहे. रुग्ण बरा झाल्यानंतर हे पल्स ऑक्सिमीटर त्याच्याकडून परत घेत ते निर्जंतुकीकरण करून, इतर रुग्णांना दिले जात आहे.तालुकानिहाय वितरित करण्यात आलेले ऑक्सिमीटरनागपूर (ग्रा.) १७०,कामठी २५०, हिंगणा २७५,रामटेक ५०,कुही ५०,नरखेड ५०,कळमेश्वर (टीएचओ) १५०,मौदा १००,भिवापूर ५०,उमरेड ५०,कळमेश्वर (आरएच) १५०,सावनेर २२५,पारशिवनी १५० आणि काटोल १००

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर