‘द प्रॉब्लेम ऑफ रूपी’ प्रकाशित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:06 IST2021-07-19T04:06:44+5:302021-07-19T04:06:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन साहित्य खंड मालिकेतील खंड-६ ‘द प्रॉब्लेम ऑफ रूपी’ या मराठी ...

‘द प्रॉब्लेम ऑफ रूपी’ प्रकाशित करा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन साहित्य खंड मालिकेतील खंड-६ ‘द प्रॉब्लेम ऑफ रूपी’ या मराठी अनुवाद ग्रंथाचे प्रकाशन करण्यात यावे, अशी मागणी विविध आंबेडकरी संस्था-संघटनांनी लावून धरली आहे.
यासंदर्भात भारतीय दलित पँथरचे अध्यक्ष प्रकाश बन्सोड, रिपब्लिकन मुव्हमेंटचे अध्यक्ष नरेश वाहाने आणि समता सैनिक दलाचे सिद्धांत पाटील यांनी मुख्यमंत्री व उच्च व तंत्र शिक्षणमंत्री यांना निवेदन सादर करीत येत्या स्वातंत्र्यदिनी हा ग्रंथ प्रकाशित करण्याची मागणी केली आहे.
‘द प्रॉब्लेम ऑफ रूपी’ हा एक महत्वपूर्ण विद्वत्तापूर्ण अर्थशास्त्रीय लिखाण असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ग्रंथ आहे. या इंग्रजी भाषेतील सहाव्या खंडाचा मराठी अनुवाद प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. कविमंडन यांनी केला. समितीचे दिवंगत सदस्य सचिव डॉ. कृष्णा कांबळे यांनी या ग्रंथासाठी आवश्यक असलेले संपादकीय काम पूर्ण केले आहे. त्यामुळे नव्या सदस्य सचिवांनी हा खंड तातडीने प्रकाशित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे निवेदनात म्हटले आहे.