बाबासाहेबांचे साहित्य प्रकाशित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:07 IST2020-12-26T04:07:09+5:302020-12-26T04:07:09+5:30
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे गेल्या १६ वर्षापासून प्रकाशन झाले नाही. राज्य सरकारने प्रकाशन समितीसुद्धा बरखास्त केली. ...

बाबासाहेबांचे साहित्य प्रकाशित करा
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे गेल्या १६ वर्षापासून प्रकाशन झाले नाही. राज्य सरकारने प्रकाशन समितीसुद्धा बरखास्त केली. बाबासाहेबांचे साहित्य प्रकाशित न झाल्यामुळे जनतेला बाबासाहेबांच्या विचारापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र शासनाचे आहे. त्यामुळे बाबासाहेबांचे अप्रकाशित साहित्य त्वरित प्रकाशित करावे, अशी मागणी रिपब्लिकन आघाडीच्या वतीने करण्यात आली. मनुस्मृती दहन दिवसानिमित्त संघटनेच्या वतीने संविधान चौकात नारे-निदर्शने केली. यावेळी संजय जिवने, घनश्याम फुसे, विनायक जामगडे, वंदना जिवने, संजय फुलझेले, रवी पाटील, अशोक बोंदाडे, शिरीष धनद्रवे, शेषराव गणवीर, सुदेश मासुरकर, निरंजन वासनिक, प्रा. राहुल मुन, प्रा. राजेंद्र टेंभुर्णे, संजय पाटील, दिनेश अंडरसहारे, रावसाहेब ढेपे, प्रवीण वंजारी, श्रीधर खापर्डे, मनीषा लोणारे, सुदर्शन मून, खिसोर सोमकुंवर, नर्गीस कुरेशी, आशिष मेश्राम, कमलेश मेश्राम, अमर सूर्यवंशी, दीपक वालदे, रामदास मेश्राम, चरण पाटील, अजय चौरे, सुनिल जवादे, नलिनी जांभुलकर, अस्मिता तायवाडे, साची जीवने आदी उपस्थित होते.