रौप्य महोत्सवी वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:11 IST2021-01-03T04:11:00+5:302021-01-03T04:11:00+5:30

पत्रकार क्लब येथे झालेल्या या सोहळ्याला काँग्रेसचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर पत्रकार क्लबचे ...

Publication of Silver Jubilee Year Calendar () | रौप्य महोत्सवी वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन ()

रौप्य महोत्सवी वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन ()

पत्रकार क्लब येथे झालेल्या या सोहळ्याला काँग्रेसचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर पत्रकार क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र अध्यक्षस्थानी होते. यावेळी डॉ. दंदे हॉस्पिटलचे संचालक डॉ. पिनाक दंदे व डॉ. सीमा दंदे उपस्थित होते. देशमुख म्हणाले, कोरोनाचे संक्रमण वाढत असताना शहरातील अनेक हॉस्पिटल ऑटोरिक्षातून आलेल्या रुग्णांना प्रवेश देत नव्हते. त्याचवेळी डॉ. दंदे हॉस्पिटलमध्ये पैशापेक्षा उपचाराला महत्त्व दिले जात होते. डॉ. पिनाक दंदे यांनी हॉस्पिटलच्या रौप्य महोत्सवी वर्षात आरोग्य साक्षरतेसोबत आरोग्यदक्षतेवर भर देणार असल्याचे सांगितले. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके, वनराईचे विश्वस्त डॉ. गिरीश गांधी, अनंतराव घारड, डॉ. उदय बोधनकर, रवी बोरटकर, अशोक पत्की, सीए विजय अग्रवाल उपस्थित होते.

Web Title: Publication of Silver Jubilee Year Calendar ()