शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दोन शेतकऱ्यांच्या हस्ते झाले अन्न व नागरी पुरवठा व सांसदीय कामकाज मंत्र्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 20:31 IST

‘3 वर्षांचा सार्थक प्रवास, सर्वांगीण विकास’ या पुस्तिकेचे प्रकाशन शुक्रवारी विधानभवन परिसरात दोन शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देनागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी ‘गिरीश बापट अ‍ॅप’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अन्न व नागरी पुरवठा मंत्री व संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी तीन वर्षांच्या कलावधीत अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून राज्यात विविध विकास योजना राबविल्या. याचा आढावा असलेल्या ‘3 वर्षांचा सार्थक प्रवास, सर्वांगीण विकास’ या पुस्तिकेचे प्रकाशन शुक्रवारी विधानभवन परिसरात दोन शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. तर सर्वसामान्य नागरिकांना थेट तक्रारी, समस्या मांडता याव्यात यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘गिरीश बापट अ‍ॅप’चे लोकार्पण ज्येष्ठ पत्रकारांच्या हस्ते करण्यात आले. गडचिरोली जिल्हा परिषदेचे सदस्य जगन्नाथ बोरकुटे व नागपूर जिल्ह्यातील अंबाडा येथील नानाजी बेले यांच्या हस्ते गिरीश बापट यांनी या पुस्तिकेचे प्रकाशन केले. पत्रकार दिनेश सातपुते यांच्याहस्ते गिरीश बापट अ‍ॅपचे लोकार्पण करण्यात आले.गिरीश बापट यांनी अन्न व नागरी पुरवठा विभाग कार्यक्षम करताना सार्वजनिक वितरण व्यवस्था निर्दोष आणि सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले. तसेच सर्वसामान्य ग्राहकांच्या हक्क आणि हिताचे रक्षण करण्यासाठी शासकीय यंत्रणा प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात वर्षांचा सार्थक प्रवास, सर्वांगीण विकास या पुस्तिकेत आढावा घेण्यात आला आहे.सामान्य माणूस हा माझा ‘देव’ : बापटमंत्री असलो तरी सामान्य माणूस हे माझे अराध्य दैवत आहे. मी सामाजिक जीवनात गेली ४० वर्षे कार्यरत आहे. सामान्य माणूस हा माझा ‘देव’ आहे. त्यांना माझ्याशी सहज संपर्क साधता यावा, तक्रारी व समस्या मांडता याव्यात. यासाठी ‘गिरीश बापट अ‍ॅप’ तयार करण्यात आले. यामुळे नागरिकांना माझ्याशी थेट संपर्क साधता येईल, असा विश्वास गिरीश बापट यांनी यावेळी व्यक्त केला.

 

 

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७girish bapatगिरीष बापट