‘एक जिद्दी प्रयास’ पुस्तकाचे प्रकाशन
By Admin | Updated: July 21, 2015 03:56 IST2015-07-21T03:56:45+5:302015-07-21T03:56:45+5:30
मागील २५ वर्षांपासून वृत्तपत्रामधील लेख, बातम्या, मान्यवरांचे विचार व कार्टून यांचे कात्रण संग्रहित करू न लेखक

‘एक जिद्दी प्रयास’ पुस्तकाचे प्रकाशन
नागपूर : मागील २५ वर्षांपासून वृत्तपत्रामधील लेख, बातम्या, मान्यवरांचे विचार व कार्टून यांचे कात्रण संग्रहित करू न लेखक श्यामसुंदर राठी यांनी त्यातून ‘एक जिद्दी प्रयास’ हे पुस्तक तयार केले आहे. त्यांच्या या पुस्तकाचे अलीकडेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. एका छंदातून तयार झालेल्या या पुस्तकात ज्ञान व विज्ञानासह धर्म, परिवार, समाज, स्वस्थ देश व विदेशासंबंधी विशेष माहिती दिली आहे. मोहन भागवत यांनी या पुस्तकाचे प्रकाशन करताना मुक्तकंठाने प्रशंसा केली. लेखक राठी हे एक अभियंता, व्यवसायी, प्रगतशील शेतकरी व समाजसेवेसाठी सदैव तत्पर राहणारे हरफनमौला व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी या पुस्तकात सुरुवातीलाच ‘मी एक वाचक आहे, लेखक नाही’ असे सांगितले आहे.